चला, मराठी ऑनलाइन वाचू या...! (भाग पाच)


कथांचे प्रकार पाहिले की मानवी जीवनाशी तिचा किती आणि कशा पद्धतीने संबंध आला असेल याची काहीएक कल्पना येते. त्यातही लोककथा, व्रतवैकल्याच्या कहाण्या यांचा तर मानवी संस्कृतीशी आदिम संबंध आहे. म्हणून तर आता कालबाह्य वाटणाऱ्या कित्येक रुढी, परंपरा यांचे मूळ या आदिम कथा – कहाण्यांमध्ये आढळले की आपण चकित होतो. अशा लोककथा, कहाण्या, तात्पर्य कथा, बोधकथा यांनी भरगच्च असलेल्या अशाच एका संकेतस्थळाची ओळख करून देणारा मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकरचा हा लेख–

 ---------------------------------------------------

जगभरातील मानवी संस्कृतीमध्ये कथा हा फार प्राचीन साहित्य प्रकार आहे. आजच्या भारतीय साहित्यातील आधुनिक कथांचा प्रवास मागे जात पुराणकथा आणि त्याही आधीच्या लोककथांपर्यंत पोहचतो, इतका हा प्राचीन साहित्यप्रकार आहे.

मागील काही भागांपासून आपण ‘ट्रान्सलिटरल फाऊंडेशन’ या संकेतस्थळावरील मराठी साहित्याची माहिती करून घेत आहोत. प्रस्तूत लेखात आपण ‘मराठी साहित्य’ या सूचीमधील ‘मराठी कथा’ या विभागातील कथांची माहिती करून घेणार आहोत. यामध्ये लोककथा, पौराणिक कथा आणि तात्पर्य कथा असे प्रकार आहेत.

मराठी कथा या विभागामध्ये ‘लोककथा’ हा उपविभाग आहे. या उपविभागातील ‘लोककथा भाग एक’ मध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासक  डॉ. सरोजिनी बाबरयांच्या 'जनलोकांचा सामवेद' या पुस्तकातील काही कथांचा समावेश करण्यात आला आहे. भगवती उषा, भावगंगा, रत्न ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. rsanjay96

      5 वर्षांपूर्वी

    लेख माहितीपूर्ण आहे. आपण आपल्या रोजच्या जगण्यात अशा कथा जवळून पाहत असतो. लोककथा आणि लोकवाड्मय हे रोज विकसित होत असते. ते फक्त शब्दांत पकडता आले पाहिजे. प्रणव सलगरकर यांचे लेखन याच भूमिकेतून पुढे जात राहावे. डॉ. संजय रत्नपारखी.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen