शब्दांच्या पाऊलखुणा – हिरवेपणाची हरितालिका! (भाग पंधरा)

संस्कृतमध्ये हरितालिका किंवा हरिताली म्हणजे दूर्वा. प्राकृतमध्ये त्याचा अपभ्रंश ‘हरिआली’ झाला. त्यावरून हिंदीमध्ये ‘हरियल’ तर मराठीमध्ये ‘हरळी’ शब्द तयार झाला. हरळीला ग्रामीण भागात ‘हरियाळी’ असंही म्हटलं जातं. दूर्वा गणपतीस प्रिय असली तरी ते एक प्रकारचे गवतच आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या गवताचा उल्लेख ऋग्वेदातही आढळतो. या गवताचं वैशिष्ट्य म्हणजे ते मुळासकट उपटले किंवा उन्हाळ्यात जळून गेले तरी त्याचे बीजांश जमिनीत टिकून राहतात आणि पाऊस पडला की पुन्हा हे गवत तरारून वर येते. अनेक प्रकारचे त्रास, छळ सोसूनही तगून राहणाऱ्या व्यक्तीला म्हणूनच ‘हरळीची मुळी’ म्हटलं जातं.

———————————————–

भाद्रपद शुक्ल तृतीयेला म्हणजे गेल्या शुक्रवारी घरोघरी हरितालिका पूजली गेली. अन् त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला गणेशाचे आगमन झाले. सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हरितालिकेचे व्रत करतात. या व्रतासंबंधी शंकर – पार्वतीच्या जन्मोजन्मीच्या कितीतरी कथा – कहाण्या तुम्ही ऐकल्या अन् सांगितल्याही असतील. या आपल्या पुराणातील प्रेमकथाच म्हटल्या पाहिजेत. 

हरितालिका व्रताची एक कथा अशी आहे – पार्वती  उपवर झाल्यावर तिचा पिता पर्वतराज हिमालयाने नारदाच्या सल्ल्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. तेव्हा तिच्या सख्यांच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी एका अरण्यात जाऊन तिने शिवलिंगाची पूजा आरंभली. पार्वतीने बारा वर्षे तप केले आणि भाद्रपदातील शुद्ध तृतीयेला दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. या आख्यायिकेच्या संदर्भात ‘हरितालिका’ या संस्कृत शब्दाचा विश्वकोशातील अर्थ आहे – हरता किंवा हरिता म्हणजे जिचे हरण केले, पळवून नेले ती आणि आलिका म्हणजे सख्या. पार्वतीच्या सख्यांनी तिला पळून जाण्यास मदत केली असा संदर्भ त्यामागे आहे. म्हणून या व्रतात शिवलिंग आणि पार्वतीच्या प्रतिमेसह तिच्या सखीची प्रतिमाही पूजली जाते.

हेही वाचलंत का?

 शब्दांच्या पाऊलखुणा – गणपती गेलो पाण्या… (भाग – चौदा)

शब्दांच्या पाऊलखुणा – पण घोंगडी मला सोडत नाही (भाग – तेरा)

ज. वि. ओक यांच्या ‘गीर्वाणलघुकोशा’त ‘हरितालिका’शब्दाचा अर्थ दूर्वा, भाद्रपद शुक्ल असा आहे. याच कोशात हरितं, हरित शब्दाचा अर्थ हिरवा रंग असा आहे, तर हरितकं म्हणजे हिरवं गवत असं म्हटलं आहे. हरितालिकेची पूजा करताना ज्या सोळा वनस्पतींची पत्री म्हणजे पाने लागतात, ती म्हणजे बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा,चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकूळ, अशोक. खरं तर याच पानांचा काय कोणत्याही झाडांच्या पानांचा रंग हिरवाच असतो. भाद्रपदात तर सारा निसर्गच हिरव्या रंगात न्हाऊन निघालेला असतो. यावरून

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 6 Comments

 1. jrpatankar

  असेच लिहित रहा.

 2. कविता अजय भागवत

  छान माहिती मिळाली

 3. pranavs

  आपल्या भारत देशात जे सण साजरे होतात ते आपण डोळे मिटून करतो असं मला कधी कधी वाटतं. कारण आपण त्या सणामागचा अर्थच बघत नाही आणि जर कोणी विचारलं की या सणाचं महत्त्व काय किंवा हा शब्द कसा तयार झाला? तर आपली दातखीळ बसते.
  अशाप्रकारच्या लेखांमधून त्या शब्दाची उत्पत्ती, इतिहास, भुमिका या सर्व गोष्टी लक्षात येतात.

 4. rsanjay96

  छान माहिती आहे. सांस्कृतिक गोष्टींंतून भाषा विकास यावर लेख योजावा.
  डॉ. संजय रत्नपारखी

 5. dabhay

  अप्रतिम।

 6. bookworm

  वा: छानच लेख! नवीन माहिती मिळाली.

Leave a Reply