शब्दांच्या पाऊलखुणा – गणपती गेलो पाण्या… (भाग – चौदा)

मराठी जनांना भाद्रपदाचे विशेष अप्रूप आहे ते या महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवामुळे! म्हणून तर या  करोनाच्या संकटातही मराठी माणसाला त्यातही विशेष गणेशप्रेमी असणारा मुंबईतील कोकणी चाकरमानी  गणपतीच्या ओढीने गावी परतला. शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणेश, त्याच्या जन्मापासून अगणित कथामिथा आहेत. गणेश हे वैदिक दैवत आहे की पुराणातील? गणेश हा आर्यांचा देव आहे की अनार्यांचा? गणेशाला केवळ शंकराने जन्म दिला की पार्वतीने आपल्या मळापासून त्याला जन्माला घातले? गणपतीचा विवाह झाला होता की त्याने आजीवन ब्रह्मचर्याचे पालन केले? गणपतीच्या पत्नी रिद्धी–सिद्ध की लक्ष्मी–सरस्वती? अशा किती तरी कथा गणपतीभोवती गुंफलेल्या आढळतात. खरं तर देवदेवतांसंबंधींच्या अशा कथामिथांमधील तथ्यापर्यंत पोहचणं जवळजवळ अशक्यच! मात्र त्यातून आपल्या समाजमनाच्या भावभावनांचा, त्याच्या उत्कटतेचा, कल्पकतेचा काहीएक अंदाज निश्चित येत असतो.

———————————————

गणेशाच्या अनेक नावांपैकी  हे (गणेश) आणि गणपती हे नाव सारख्याच अर्थाचे आहे आणि दोन्हीही सामासिक शब्द आहेत. गणेश किंवा गणपती म्हणजे गणांचा ईश्वर किंवा स्वामी. ‘गण’ हा संस्कृत शब्द ‘गण्’ या धातूपासून तयार झाला असून या शब्दाच्या अर्थात काळानुसार बरेच बदल झालेले दिसतात. जमाव, समुदाय, संप्रदाय, भक्त, मोजणे, मापणे, समजणे, मानणे इ. अर्थच्छटा या शब्दाला असलेल्या दिसतात. कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते, ‘ऋग्वेदातील ‘गण’ शब्दाला जातीवाचक अर्थ होता. नंतर तो ‘आर्यांचा जमाव’ असा झाला. पुढे त्याला लोकशाहीचा राजकीय अर्थ आला.’ कुलकर्णी यांचे हे विधान आधारभूत मानले तर ‘गण’ शब्दाचा मूळ अर्थ जमाव किंवा समुदाय असावा. कालांतराने त्याचा वापर जसजसा विस्तारत गेला तसतशी इतरही अर्थांची त्यात भर पडत गेली असावी. विशिष्ट तत्त्वावर–नियमावर – हेतूवर श्रद्धा, भक्ती असलेल्यांचा जमाव किंवा समुदाय होतो. मग एखाद्याच्या निष्ठेवरून त्याला समुदायात प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवलं जातं, त्यानुसार त्यांच्या संख्येची निश्चिती केली जाते. कोणताही समुदाय तयार होण्याचा हा क्रम लक्षात घेतला की ‘गण’ शब्दाला मानणे, मोजणे, भक्त या अर्थच्छटा कशा प्राप्त झाल्या असाव्यात हे सहज कळतं. विशिष्ट संप्रदाय मानणाऱ्यांना भक्त या अर्थाने म्हणूनच ‘गण’ म्हटलं जात असावं.

हेही वाचलंत का?

शब्दांच्या पाऊलखुणा – पण घोंगडी मला सोडत नाही (भाग – तेरा)

शब्दांच्या पाऊलखुणा – चावीचा दगड (भाग – बारा)

‘गण’ शब्दाने तयार झालेले इतरही बरेच शब्द सांगता येतात. ‘गणगोत’ हा शब्द गण आणि गोत या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. एकाच गोत्राच्या, वंशाच्या लोकांचा समूह म्हणजे गणगोत म्हणता येईल. ज्योतिषशास्त्रामध्ये तीन गण मानले जातात – देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. हे तीन गण म्हणजे  विशिष्ट गुणांची, स्वभावांची वर्गवारी करून केलेले गट दिसतात. मोजणे, मानणे या अर्थाचे तर बरेच शब्द सांगता येतील –  गणणे (मोजणे, मापणे, पर्वा करणे, महत्त्व देणे) गणती (मोजणी), गणन (मोजणी, एकूण संख्या), गणना (संख्या, हिशेब, अंतर्भाव), गणनीय (हिशेबात घेण्याजोगा, महत्त्वाचा), गणसंख्या (सभेचे काम चालू होण्यासाठी अवश्य असलेली सदस्यांची संख्या), गणित (अंकांची घडामोड करून त्यापासून काही फळ काढण्याची विद्या). ‘गणवेश’ या शब्दातही गण आहे आणि त्याचा

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

 1. Rdesai

  खूप सुंदर लेख! गणेशाचे अनेक संदर्भ लक्षात आले.

 2. jgajanan

  खुप छान ..

 3. pvanashri

  खूप छान लेख

 4. nilambari

  छान

 5. pranavs

  खूप सुंदर लेख आहे .
  गण,गणेश, गणपती या शब्दांचे अनेक अर्थवलंय खूप छान प्रकारे आहेत.तसेच बोलीभाषेतील म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर उत्तम प्रकारे केला आहे.

Leave a Reply