त्रिभाषा सूत्रः समज आणि गैरसमज

नुकतेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. त्याच्या मूळ मसुद्यातील हिंदीच्या वरचष्म्याला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे की काय प्रत्यक्ष धोरणात समितीने त्रिभाषा सूत्राविषयी स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळलेले दिसते. भारतासारख्या बहुभाषिक देशात शिक्षणाचे माध्यम, शिक्षणात इतर भाषांचा कसा आणि कितपक समावेश असावा, हे ठरविण्यात त्रिभाषा सूत्राची कळीची भूमिका होती आणि आहे. मात्र कोठारी आयोगापासूनच महाराष्ट्रासह देशभर त्रिभाषा सूत्र त्याच्या मूळ उद्दिष्टांपासून भरकटत गेलेले दिसते. अभ्यासक्रम तयार करताना त्रिभाषा सूत्र समजून घेताना होणारी गफलत आणि त्यातून निर्माण होणारे समज – गैरसमज यांचा मागोवा घेणारा भूगोलाचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक विद्याधर अमृते यांचा हा लेख.

———————————————

भारताच्‍या शिक्षण पद्धतीमध्ये भाषांबद्दलचे धोरण नेहमीच संवेदनशील राहिले आहे. विशेषत: त्रिभाषा सूत्राचा अर्थ समजून घेण्यात आणि अर्थ लावण्यात राज्‍या-राज्‍यानुसार वेगवेगळा प्रकार दिसतो. सहा आंधळे व एक हत्ती या कथेप्रमाणे त्रिभाषा सूत्राची अवस्था झालेली दिसते.कोणत्याही तीन भाषा किंवा दोन भाषा परीक्षेसाठी व तिसरी केवळ प्राथमिक स्‍तरावर किंवा तीन भाषांमध्ये स्‍थानिक भाषा अनिवार्य व इतर दोन भाषा किंवा राज्‍यभाषा, इंग्रजी, संस्‍कृत हे व असे अनेक प्रयोग देशात चालू होते व आहेत. त्‍यात काहींनी स्‍थानिक भाषा वगळून परदेशी दुसरी भाषा (फ्रेंच/जर्मन/अरबी) असाही प्रयोग केलेला आढळतो.

हेही वाचलंत का?

नवनवीन शैक्षणिक धोरणे आणि आकृतिबंध

शालेय अभ्यासक्रम आदर्शवत करण्यासाठी…

अशा संभ्रमावस्थेचे मुख्य कारण म्‍हणजे त्रिभाषा सूत्राचे मूळ उद्दिष्ट लक्षात न घेता व त्‍याचे सर्वसमावेशक स्‍वरूप लक्षात न घेता या तीन भाषांची निवड तसेच त्‍यांचा अभ्यासक्रम राबवण्यात आला. त्‍यामुळे उत्तरेत प्रचंड इंग्रजी-विरोध तर दक्षिणेत हिंदी-विरोध अशी बिकट परिस्‍थिती निर्माण झाली. अर्थात राजकारण्यांनी अशा भावनाशील समस्येचा आपापली पोळी भाजण्यासाठी उपयोग केला नाही तर ते आपले ‘भारतीय’ राज्‍यकर्ते कुठले! मद्रास इलाख्यात राजगोपालाचारी उर्फ राजाजी यांनी हिंदी भाषेचा जेवढा प्रसार केला तेवढा कोणीही केला नसेल. पण तेच राज्‍य शेवटी हिंदीच्‍या इतके विरुद्ध गेले की तिथे दंगलीदेखील उसळल्‍या! त्‍यामुळे पं. नेहरू व मा. शास्‍त्रीजी यांना तिथे जाऊन

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

 1. dabhay

  Sir
  आपण जसे म्हणतात तसेच धोरण राबविले तर उत्तमच होईल।
  भाषा ही प्रथम संवादासाठी पाहिजे मग त्यातील साहित्य,व्याकरण इत्यादी।
  अप्रतिम समीक्षा केल्याबद्दल त्रिवार धन्यवाद।

 2. pranavs

  अत्यंत महत्त्वपूर्ण विश्लेषण….

Leave a Reply