नागरिकायनच्या ‘माझा नगरसेवक’ ॲपचे लोकार्पण


माहितीचा अधिकार वापरून करण्यात आलेले नगरसेवकांच्या कार्याचे मूल्यमापन म्हणजे ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ या प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या ‘नागरिकायन’ या संशोधन केंद्राच्यावतीने माझा नगरसेवक My Corporator हे ॲप बनविण्यात आले आहे. रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी संध्या ६ वाजता ऑनलाइन वेबसंवादाच्या माध्यमातून या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पीसीजीटीचे संस्थापक विश्वस्त ज्युलियो रिबेरो, माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी, मनीलाइफ फाऊंडेशनच्या सुचेता दलाल, माहिती अधिकार मंचाचे भास्कर प्रभू, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक संजीव चांदोरकर आणि परिवर्तन भारतचे तन्मय कानिटकर या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमास पीसीजीटीच्या विश्वस्त ॲना सलढाणा आणि तेथील माहिती अधिकार विभागाचे सल्लागार रंगा राव, ‘माझा प्रभाग माझा नगरसेवक’ या प्रकल्पात आजवर सहभागी झालेले मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागांमधील कार्यक्रर्तेही उपस्थित होते.

या ॲपच्या कार्यक्रमात पीसीजीटीचे संस्थापक विश्वस्त ज्युलियो रिबेरो यांनी सांगितले की, ॲपचा वापर करून नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक बनविणे हा एक स्तुत्य उपक्रम असून तरुणांपर्यंत हे ॲप पोहोचविण्यासाठी पीसीजीटी नक्कीच सहकार्य करेल. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी सांगितले की, कोरोना काळात लोकांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी आम्हांला माहिती आयुक्तांच्या मागे लागावे लागते. मात्र त्याच काळात संपूर्ण देशातील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अधिक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘मराठी प्रथम’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


लोकशाही , मराठी अभ्यास केंद्र , नागरिकायन , नगरसेवक , नगरसेवकाचे प्रगतिपुस्तक , माझा नगरसेवक माझा प्रभाग

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.