भाषाविचार - साधनांचा शोध आणि इतिहासाचं पुनर्वाचन (भाग - १८)


“आज महाराष्ट्रातल्या अनेक अभिलेखागारांत मोडीतले दस्तावेज अक्षरश: वाचणाऱ्यांची वाट पाहत आहेत. पण मोडीच्या प्रशिक्षणाची स्थायी व्यवस्था आणि दस्तावेजांचं काम मार्गी लावण्याचं काही नियोजन नाही. त्यामुळे आपल्याकडच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी जगभरातले लोक येत आहेत, पण भाषेच्या टप्प्यावर अडखळत आहेत. इतिहासाची इतकी सातत्यपूर्ण हेळसांड करण्यासाठी जर काही पुरस्कार असेल तर तो आपल्याला मिळावा, इतकी पात्रता आपण कमावली आहे.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून  इतिहासाच्या पुनर्वाचनाबाबत सांगतायत -
छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातल्या लोकांच्या दृष्टीने फारच आस्थेचा विषय आहे. गेल्या काही काळात तो गंभीर जातीयवादाचाही विषय झाला आहे. त्यांच्याबद्दलचे ठोकताळे फार न बदलता उदात्तीकरण, गौरवीकरण अशी निर्बुद्ध समाजाची सर्व लक्षणं आपण प्रकट करत आहोत. त्याबद्दल बोलणंसुद्धा लोकांना फारसं चालत नाही. हे होण्याच्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, वाचनाचा अभाव आणि या अभावग्रस्ततेत भाषिक अभावग्रस्तता मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास समजून घ्यायचा झाला तर मोडी, फारसी, उर्दू तर माहीत असावं लागतंच; शिवाय डच, फ्रेंच, पोर्तुगीज इंग्रजीही माहीत असावं लागतं; आणि भाषांचं हे ज्ञान वरवरचं असून चालत नाही. भाषांच्या तत्कालीन व्यवहारातल्या अर्थछटा कळल्या नाहीत तर अर्थाचा अनर्थ होतो; त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकाला अनेक भाषा चांगल्या यायला हव्यात. त्यांचं तुलनात्मक स्थानमाहात्म्य माहीत असायला हवं. अर्थात, शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे 'पुत्र महाराष्ट्राला झाला', 'पुत्र सह्याद्रीला झाला' हे वर्णन; आणि महाराजांचा मृत्यू म्हणजे 'आणखी काय लिहू', 'शब्दच संपले' असं वर्णन करायला, भाषिक फुलोऱ्याव्यतिरिक्त काहीही नसलं तरी चालतं. ज्या समाजाचं एवढ्यावर भागतंय तो कुपोषित होऊन कणाकणाने मरतोय असं समजायला काहीच हरकत नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , पुस्तके , वाचन संस्कृती , दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय उत्तम आणि मुद्देसूद लेख !!

  2. Niranjan Joshi

      4 वर्षांपूर्वी

    Brilliant analysis, wonderful insights, superb and forceful language! Absolutely excellent article! Many thanks to Prof. Pawar and to Bahuvidh

  3. Sanjay Ratnaparkhi

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख आणि प्रतिक्रिया आहे. आपण भाषा शिक्षण हे खूप तुच्छ मानलं आहे. हे बदण्याची नितांत आवश्यकता आहे. डॉ. संजय रत्नपारखी



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen