शब्दांच्या पाऊलखुणा - बाईलाही मिश्या दिसतात! (भाग ३०)


मिश्या येणं म्हणजे मुलाचा बाप्या, पुरुष होणं. वयाच्या एका टप्प्यावर पुरुषाच्या शरीरात निर्माण होणाऱ्या विशिष्ट संप्रेरकांचा एक बाह्य परिणाम म्हणजे मिश्या फुटणं. याच वयात जगाच्या अन् स्वतःच्याही वागण्याविषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. यावरूनच या काळाला ‘मिश्या व मतं एकदम फुटणारं वय’ संबोधलं जात असावं. पौगंडावस्थेत ओठांवर नुकतीच फुटू लागलेली कोवळी लव म्हणजे मिसरूड. तर उतार वयात शरीर थकल्याचा निर्देश करणारी मिशीवरून एक म्हण आहे, ‘पांढऱ्या मिश्या अन् आल्या दशा’. मिश्यांची बदलती रूपं मांडणारा साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख
‘मुछ नहीं तो कुछ नही’ म्हणत मिशी असणं हे एकेकाळी रांगड्या पुरुषाचं, मर्दपणाचं लक्षण मानलं जाई. आजही त्यात विशेष फरक पडला नसला तरी बॉलिवूडमधील फॅशन्सच्या बदलत्या ट्रेंडनुसार तरुणांनी हे लक्षण बादही ठरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला दिसतो. प्राचीन काळातही वेगवेगळ्या राजवटींच्या काळात मिश्याबाबतची पुरुषाभिरुची बदलत गेलेली आढळून येते. माणूस हा मर्त्य प्राणी आहे, या वैश्विक विधानाप्रमाणे पुरुषाला मिश्या येणं हे नैसर्गिक आणि वैश्विक आहे. मात्र भारतासारख्या जातिव्यवस्थेचे प्राबल्य असलेल्या देशात झुबकेदार मिश्या कुणी ठेवायच्या, त्या कुणी पिळायच्या याचेही संकेत ठरवले गेले. असे संकेत मोडणारे दलित तरुण विशिष्ट जातीच्या रोषाला बळी पडल्याच्या घटना आजही घडतात, इतकं मिशांचं सांस्कृतिक महत्त्व  दिसतं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र
भाषा

प्रतिक्रिया

 1. Pradip Patil

    2 आठवड्या पूर्वी

  अप्रतिम सहज सुलभ भाषेत, पण गर्भीत मतित्तार्थता.......

 2. Jayashree patankar

    4 आठवड्या पूर्वी

  सर्वागीण आकलन.

 3. Hemant Marathe

    5 आठवड्या पूर्वी

  हसत खेळत छान विषय मांडलाय.

 4. Jayashree Kurundkar

    5 आठवड्या पूर्वी

  मस्त

 5. atmaram jagdale

    5 आठवड्या पूर्वी

  अप्रतिम ! खुसखुशीत !वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen