भाषाविचार : टेड टॉक - एक व्यासपीठ (भाग – २२)


“भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाषा नसणं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं तुटल्यासारखं आहे, याची जाणीव सुझन तालहोक आपल्या श्रोत्यांना करून देतात. त्यांच्या भाषणादरम्यान श्रोते हसतातही आणि अंतर्मुखही होतात. अशी बरीच भाषणं टेडवर आहेत. त्यातली बहुसंख्य भाषणं इंग्रजीत आहेत, म्हणजेच इंग्रजीला विरोध करणारी भाषणंसुद्धा इंग्रजीतच आहेत. एका अर्थाने लोक सहभागातून ज्ञाननिर्मिती, विचारांचं आदानप्रदान होत आहे, असं आपण काय करतो आहोत? भारतीय भाषांबद्दल जो काही विचार देशभरात होतो आहे, तो एकमेकांपर्यंत पोहोचतो आहे का?” मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून  सांगतायत भाषांच्या एका व्यासपीठाबद्दल  - टेड टॉकबद्दल  -
'टेड टॉक' (Ted Talk) हे जगभरातल्या वेगवेगळ्या विषयांवर बोलणाऱ्या लोकांचं चर्चेचं एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर साधारणपणे १८ मिनिटांचा वेळ आपल्याला विषय मांडायला मिळतो. यापेक्षा जास्त बोललं गेलं तर लोक पाल्हाळीक बोलतात आणि पुनरावृत्ती होते, असं आयोजकांना वाटतं. जगभरात टेडच्या परिषदा होतात. त्यातली निवडक भाषणं  टेड टॉक्स (Ted Talks) म्हणून प्रसिद्ध होतात. लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. हे 'टेड टॉक्स' एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं साधन असू शकतं, हे लक्षात घेऊन जगभरचे भाषातज्ज्ञ व कार्यकर्ते आपले विचार त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवतात. असंच एक भाषण डिसेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध झालंय. विशेष म्हणजे ते टेड बैरूत म्हणजे टेडच्या बैरूत शाखेने प्रसिद्ध केलेले आहे. ते भाषण आहे सुझन तालहोक यांचं. त्या लेबनॉन या देशाच्या नागरिक आहेत. तिथे त्या स्वयंसेवी संस्था चालवतात. तसंच अरबी भाषेच्या विकासासाठी काम करतात. त्यांचं हे भाषण अरेबिकमधलं आहे. यूटूबवरच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये असतात त्याप्रमाणे या भाषणाला उपशीर्षके म्हणजेच सबटायटलस् आहेत. त्यामुळे हे भाषण कळणं सोपं होतं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , पुस्तके , भाषा महत्त्व , दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen