“महाराष्ट्रातील प्रत्येकाला वैचारिक खाद्य देण्याची क्षमता मराठीमध्ये आहे. मराठीतील प्रगल्भ ज्ञान अन्यत्र देण्याची व अन्य ठिकाणचे ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न मराठी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, तशी त्यांची क्षमता आहे. मराठी भाषेचा अभिमान जरूर बाळगावा, या भाषेवर प्रभुत्व मिळवावे, पण मराठी भाषक विद्यार्थ्याने इंग्रजीखेरीज अन्य एखादी देशी-परदेशी भाषा शिकणे आवश्यक आहे. इंग्रजी ही उद्योग-व्यवहारातील भाषा आहे. या पुढच्या काळात चलन, सोने-नाणे ही संपत्ती महत्त्वाची असणार नाही, तर ज्ञानाधारित संपत्ती ही आता मोठी ताकद बनते आहे.” सुदृढ मराठीची गरज नमूद करत मराठी भाषा आणि मराठी भाषक भविष्यात मोठे होण्यासाठीचा गुरुमंत्र डॉ. अरुण निगवेकर यांनी या लेखाच्या माध्यमातून मांडून ठेवला आहे.
...
समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर भाषा विषयांबाबत अजूनही खूप शंका आहेत. म्हणजे अशा की, मराठी शिकण्याची गरज आहे का? गरज असेल तर विद्यापीठीय पातळीवर मराठी भाषेला किती महत्त्व दिले जात आहे? हे प्रश्न मराठीचे शिक्षक आणि जे मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत ते विद्यार्थी, अशा दोघांच्याही मनात आहेत. पदव्युत्तर पातळीवर मराठीचे अध्यापन करणारी शेकडो केंद्रे राज्यभरात आहेत. त्यातून किमान पाच हजार पदवीधर दरवर्षी तयार होतात. या पदवीधरांपैकी किती जणांनी मराठीचे खऱ्या अर्थाने अध्ययन केलेले असते? मराठीतील साहित्य किती वाचलेले असते? अध्यापनासाठी नेमलेली पुस्तके तरी पूर्णतः वाचलेली असतात का? त्यांनी मराठी भाषा म्हणून काय समजून घेतलेले असते? व्यावहारिक जगात अशा पदवीधरांचे स्थान काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पदवी मिळाली म्हणजे पुढचे सगळे जीवनव्यवहार सुरळीत झाले, असे घडत नाही. देशातील तीस राज्यांत व काही केंद्रशासित प्रदेशांत त्यांच्या वेगवेगळ्या भाषा तेथील तरुणाई सफाईने वापरत आहे. या पार्श्वभूमीवर, आपण आपल्या तरुणाईच्या मराठीचा विचार केला पाहिजे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा
, ज्ञानभाषा
, डॉ.अरुण निगवेकर
, मराठी अभ्यास केंद्र