अंक – हंस, जानेवारी १९५६ पुलाव, बिअर, शब्दकोडी आणि हुतूतू यांच्याप्रमाणेच प्रवासाचीही आपल्याला मुळीच आवड नाही. त्यांतून ‘केल्याने देशाटन’ पद्धतीचा प्रवास म्हटला, की ‘खिसा-पाकीट सांभाळा’ हा ‘बेस्ट’ वाहनांतला व्यवहारदक्ष निरोप आधी नजरेसमोर उभा रहातो, आणि नंतर निसर्गसौंदर्य (स्थिर आणि चर), व्यासंगांत भर, सांस्कृतिक देवघेव (बरीचशी घेवच), नागरी यांत्रिकतेपासून तात्पुरती सुटका आदी आदी महत्त्वपूर्ण, आकर्षक मुद्दे. तथापी, रॉकफेलर किंवा फोर्ड फौंडेशनची शिष्यवृत्ती जरी नाही तरी, एका ठराविक (आणि सुमार) बजेटांत प्रवासखर्च बसवण्याची भरीव आश्र्वासनं येतात आणि सर्वांवर उपकार म्हणून मी प्रवासाला तयार होतो. एकंदर प्रवासाविषयी रक्तांत ही अशी उपजतच नावड; त्यांतून जलप्रवासाशी जास्तच नेणता दावा. – तुकाराम, रामदास या महाराष्ट्राच्या थोर संतांबरोबरच त्या नावांच्या दिवंगत आगबोटींनाही मी अद्याप तसा विसरलेलो नसतो. बोटी पाण्यावर कां तरंगतात या कोड्याची उकल शास्त्रीय पातळीवर झाली असली, तरी व्यवहारांत ते तेवढंसं विश्र्वनीय नव्हेच, याचीही जाणीव असते. पण एवीतेवी महिन्याच्या सरासरी खर्चाबाहेरच्या भरीव खर्चाचं जिवंत मरण पत्करलं आहेच, तर मग निव्वळ मरणाची तरी तमा कशाला, (आणि कुणाला,) असा अत्यंत बेदरकार विचार बेदरकारपणंच मनांत डोकावतो, - ठरतो. (खुष्कीच्या प्रवासापरीस जलप्रवास स्वस्तच, हा थोडा कमी बेदरकार व्यवहारही यामागं नसेलच असं कुणी म्हणावं?) तत्त्व म्हणून प्रवासाला तयार होऊन लोकांना उपकृत केलेलं असतं. व्यवहारांत जलप्रवास कबूल करून मी भारतीय आणि एकंदरीनं जागतिक नौकनयनावर उपकार करतो. मॉस्को, पेइकिन (अशुद्ध उच्चार—पेकिंग), व्हिएन्ना, हेलसिंकी, पारी, (अ.उ.—पॅरिस,) किंवा स ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
विनोद
, हंस
, विजय तेंडुलकर
, अनुभव
, दीर्घा
ArunBhandare
6 वर्षांपूर्वीविजय तेंडुलकरांचा प्रवासलेख प्रथमच वाचायला मिळाला.पु.ल.च्या शैलीशी जवळीक सांगणारा मस्त लेख.
jyotsnasonalkar
6 वर्षांपूर्वीजुन्या काळातील गमतीशीर आठवणी वाचुन मजा आली. चित्रे डोळ्यासमोर तयार होतात.