गोवा सत्याग्रहातली आजीबाईंची सत्यकथा

अंक: पुरुषार्थ जून १९५५

आजचा हा लेख म्हणजे मराठी स्त्रीच्या कणखरपणाचा, देशभक्तीचा आणि सामाजिक कर्तव्यबुद्धीचा हलवून टाकणारा आलेख आहे. या लेखाच्या लेखिका अंबिकाबाई दांडेकर  म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नि. दांडेकर यांच्या मातोश्री. या लेखाची पार्श्वभूमी थोडी खोलात जाऊन सांगावी लागेल, त्याशिवाय यातील नावे आणि संदर्भ कळणार नाहीत. गोवा मुक्ती संग्रामाचा तो काळ होता आणि गोव्याचं पारतंत्र्य महाराष्ट्राला क्षणोक्षणी सलत होतं, महाराष्ट्रानं गोवा मुक्तीचा ध्यास घेतला होता. नॅशनल काँग्रेस गोवा समितीची बैठक पुण्यात पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या घरी  फेब्रुवारी १९५५ मध्ये झाली आणि त्यांनी गोव्यातील नियोजित सत्याग्रहाचं नेतृत्व करण्याचं  जाहीर केलं. मात्र शास्त्री तेंव्हा नुकतेच एका शस्त्रक्रियेतून बरे होत होते त्यामुळे आग्रहानं आणि हट्टानं या सत्याग्रहाची जबाबदारी शास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी आपल्या शीरावर घेतली. सत्याग्रहाचा तपशील ठरवण्याची जबाबदारी नॅशनल गोवा काँग्रेसचे  प्रमुख पीटर अल्वारिस यांच्याकडे होती.  ६ एप्रिल १९५५ रोजी म्हापशात सुधाताईंच्या अध्यक्षतेखाली मेळावा घ्यायचे ठरले. पोर्तुगीज सरकार हा मेळावा आणि सत्याग्रह होऊ  देणार नाही याची खात्री असल्यानं सत्याग्रही कार्यकर्त्यांनी लपत छपत गोव्यात पोचायचे असे ठरले. या तरूण, मध्यमवयीन कार्यकर्त्यांसोबत त्या सत्याग्रहासाठी  उत्साहाने रवाना झाल्या अंबिकाबाई दांडेकर, तेंव्हा वय वर्षे सत्तर! सत्याग्रहासाठी त्या कशा गेल्या, वयाच्या सत्तरीत सत्याग्रहींवरील अत्याचाराला  त्या कशा सामोऱ्या गेल्या आणि महाराष्ट्रात परत आल्या…या घटनांचा हा अंबिकाबाईंनी स्वतःच लिहेलेला हा रोमांचकारी वृत्तांत एकाचवेळी गंभीर आहे आणि गंमतीदारही. त्याचवेळी तो आपल्या आत असलेला देशप्रेमाचा वन्हीही सहजगत्या चेतवतो. गोव्यातून परतल्यावर अंबिकाबाईंनी हा लेख त्याच वर्षी ‘पुरुषार्थ’च्या अंकात लिहिला होता-

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. छान

  2. सुंदर आहे लेख!!मी महादेव शस्त्रिंकडे कामाला जायची अर्थात दोघेही खूप थकले होते.खूपच भावला लेख

  3. रसाळ, बाळबोध (चांगल्या अर्थाने) लेखन.

  4. राष्ट्रप्रेमानी भारावलेल्या माणसांचा आमचा वारसा!
    आता आमचीच पुढली पिढी ” भारत तेरे टुकडे टुकडे होगे “ची भाषा करताना बघून व त्यास प्रतिष्ठा
    देणारे महाभाग बघून शरम वाटते. आमची पिढी कमी पडली हेच खर.

Leave a Reply

Close Menu