साबण निर्मितीच्या धडपडीची गाथा

अंक – यशवंत, ऑक्टोबर १९५१

आज साबणाचे शेकडो ब्रँड्स आपल्याला दिसतात परंतु एकेकाळी साबण वापरणे ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी होती. साबण स्वस्त होऊन घरोघरी पोचवण्यात ज्या शेकडो प्रयत्नांचा उपयोग झाला त्यातील एका प्रकरणाची माहिती प्रस्तुत लेखात आहे. विशेष म्हणजे हा प्रयत्न १९३० साली बाळासाहेब वर्तक या मराठी माणसाने केला होता.  साबण हा शब्द भारतात आला तो अरेबिक भाषेतून. साधारण पंधराशे वर्षांपूर्वी भारताचा जगाशी व्यापार सुरू झाला, त्यातून हा शब्द आला. साबणाच्या निर्मितीचे अनेक प्रयोग त्याकाळी जगभर सुरू होते.  सतराव्या शतकाच्या मध्यास होऊन गेलेल्या संत तुकारामांच्या एका अभंगात सुद्धा ‘नाही निर्मळ मन, काय करील साबण’ असे म्हटले आहे. तुकारामांना अपेक्षित असलेला साबण अर्थातच आजच्या काळातला नव्हता, तो त्याकाळी राख,वनस्पतीजन्य तेले, चुनखडी यांपासून बनवला जात असे. साधारण दोन हजार वर्षे घरगुती साबण विविध प्रकारांनी अस्तित्वात आहे परंतु एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस जगभर साबणाचे औद्योगिक उत्पादन सुरू झाले. भारतात १९००च्या सुमारास साबण वापरला जाऊ लागला. त्यानंतरच्या काळात देशभर एतद्देशीयांनी साबण निर्मितीचे प्रयत्न केले. नव्या युगाची कास धरणाऱ्या औंधच्या पंतप्रतिनिधींनी १९३० साली  साबण कारखाना काढला. त्याचवेळी बाळासाहेब वर्तक या सामान्य मराठी माणसाने नोकरी, संसार, आजार, आर्थिक चणचण यांचा सामना करीत साबणाचा कारखाना काढण्याचा कसा  प्रयत्न केला त्याची ही संस्मरणीय गाथा आहे. ती १९५१ साली यशवंत मासिकात प्रसिद्ध झाली होती.

पूर्ण लेख बराच मोठा आहे. त्यातला काही संपादित अंश आपल्या वाचकांसाठी देत आहोत.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

 1. ganesh.dolas16@gmail.com

  खुपच छान आणि स्फुर्तिदायक

 2. rohitbhide90

  अप्रतिम

 3. smmohite.hr@outlook.com

  Superb

 4. rajakulkarni11@gmail.com

  खूप सुरेख माहिती… मराठी माणसाने उद्योग करावा यासाठी प्रेरक लेख…. तसेच इतरही महाराष्ट्रीयन उद्यजकांच्या धडपडीचा प्रवास दिल्यास चांगलेच होईल….
  विको turmeric चा प्रवास सुद्धा असाच परंतु आज ती जगभर पोहोचली

 5. Kadganche

  खूप छान माहिती. स्फुर्तीदायक व्यक्तिमत्त्व

Leave a Reply