अंकः माणूस, जानेवारी १९६५
वर्तमानपत्रीय राशिभविष्याचा उगम केव्हा झाला व तो कशात आहे, याचा पत्ता लागणे अवघड व दुरापास्त काम आहे. राशिभविष्य हे गोचरीचे म्हणजे दैनंदिन किंवा चलित ग्रहस्थिती पाहून भविष्य सांगण्याचे एक अंग आहे. मूलतः गोचर ही काही स्वतंत्र ज्योतिषपद्धती नाही. दशा, ताजिकची कुंडली किंवा डायरेक्शन पद्धती यांसारख्या एखाद्या प्रमुख पद्धतीला पोषक म्हणूनच ती वापरली जाते. स्वतंत्र पद्धत म्हणून वापरावयाची झाली तर समग्र जन्मकुंडलीवर तिचा प्रयोग करणे आवश्यक आहे. परंतु १२ ग्राहांपैकी केवळ एका चंद्रावर ती आधारली जाते. अत्यंत द्रुतगतीने जाणाऱ्या ग्रहांपैकी चंद्र हा एक ग्रह (पृथ्वीचा उपग्रह) आहे. या ग्रहाचा उपयोग करून एक दोन दिवसांचे अंतराने ढोबळ भविष्य करण्यात केला जातो. अनेकवेळा या पद्धतीने केलेल्या भविष्याची सत्यता येते व भोळ्या वाचकाला चमत्कार वाटतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .