चटका


अंकः माणूस, एप्रिल १९६५

एक दिवस असाच सकाळी बसस्टॉपवर बसची ‘आराधना’ करत उभा होतो. पहिल्या बसने नुकतेच मला ‘वेटिंग लिस्ट’वर ठेवले होते व धाड्धाड् करत गेली होती. पुढच्या बसला निदान पंधरा मिनिटे तरी निश्चित होती. माझे आपोआपच समोरील इमारतीवर लक्ष गेले व संतोष झाला.

समोरच्या गॅलरीत एक सुंदर चेहरा आपल्या गोऱ्या हाताच्या मुठीचा गोबऱ्या गालाला आधार देऊन थोडासा रेलून उभा होता. तांबूस गोरा रंग, बारीक डोळे पण तीक्ष्ण नजर, तरतरीत नाक व घट्ट बांधलेली ‘अजंठा केशरचना’ यामुळे तर फारच उठाव आला होता. पांढराशुभ्र ‘स्लीव्हलेस’ ब्लाऊझ व पिवळ्या काठांची तांबडी लाल साडी. सगळा थाट त्या टुमदार इमारतीच्या किडकिडीत गॅलरीला फारच शोभून दिसत होता. कपाळावरील कुंकवाचा टिळा व गळ्यातील मंगळसूत्र तिच्या गृहीणीपदाची जाणीव देत होतं. बसकडे डोळे लावण्याचे मी पार विसरून गेलो. एवढ्यात एक तरुण घाईघाईने आतून बाहेर आला. तिच्या कानाशी लागला. ती केवढी तरी लाजली. गोबरे गाल अधिक फुलले, खांद्यावरच्या पदराशी हातांनी उगाचच चाळवाचाळव केली व पटकन् ती आत पळाली. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माणूस , ललित
ललित

प्रतिक्रिया

  1. Priyanka Borphale

      3 वर्षांपूर्वी

    खूप छान

  2. Siddharth Shastri

      3 वर्षांपूर्वी

    शीर्षक समर्पक.

  3. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    खूप छान! असंही एक अनामिक नातं असू शकतं ही कल्पनाच उत्तम. धन्यवाद!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen