कधी पाहुणचार, कधी अत्याचार

पुनश्च    वाचस्पती    2018-08-22 06:00:32   

महाराष्ट्र हा व्याख्याने, प्रवचने आणि भाषणांचा प्रांत आहे हे जेवढे खरे तेवढाच तो वक्त्यांची खोड मोडणारा प्रांतही आहे. कार्यकर्ते, आयोजक नावाचे प्राणी अनेकदा व्याख्याने देण्यासाठी 'बकरा' शोधत असतात, शक्यतो फुकटचा. तर काही ठिकाणी खरोखरच उत्तम श्रोेते आणि आदर्श आयोजकही भेटतात. यापुढे जाऊन काही जण पाहुणचाराने सळो की पऴो करून सोडतात. अशा काही आंबट गोड अनुभवाची ही चवदार शिदोरी उघडली आहे वाचस्पतींनी. मूळ लेख कधी काळी चित्रमयजगत् मध्ये आला होता. ********

व्यासपीठावरील गंमती

पूर्वीच्या एका संस्थानाची ती राजधानी. तेथून व्याख्यानाचे निमंत्रण मला आले-एकदा नव्हे, अक्षरशः आठ वेळा. तेथील तरुण-तरतरीत कार्यकर्ता मला बोलावण्यास आला. मौज अशी की, माझी बाहेर पडण्याची वेळ नि त्याची निमंत्रणास येण्याची वेळ एकच पडावयाची; त्यामुळे आम्हां दोघांची गांठ काही पडावयाची नाही. पण तो कार्यकर्ता होता ‘एका कोळीया’च्या वंशातला! त्या कार्यकर्त्याने एक सविस्तर पत्र माझे घरी लिहून ठेवले- आणि मला व्याख्यानास येण्यास आळवून-आर्जवून लिहिले. “जावईबुवांसारखे आपल्याला इतके अगत्याने नि सन्मानाने बोलवायला कोण बसलेय” असा विचार करून मी लगेच त्या कार्यकर्त्याला उत्तर ठोकून दिले, ‘येतो’ म्हणून. कोणत्या मोटारीने, किती वाजतां, आमची स्वारी त्या संस्थानी राजधानीत दाखल होणार याची नक्की वेळही मी कळविली. माझे मन मारे मांडे खात होते की, आपण मोटारीतून उतरतांच, संस्थानची तमाम शिबंदी आपल्या स्वागतार्थ उभी असेल-संस्थानी बँड वाजू लागेल-आपल्याला पुष्पहार घालण्यांत नागरिकांमध्ये चुरस लागेल-मग मिरवणूक-पानसुपाऱ्या.... पण काय? सारा शुकशुकाट! दोन मळके टांगेवा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , चित्रमयजगत् , अनुभव , वाचस्पती

प्रतिक्रिया

 1. nkamat67

    2 वर्षांपूर्वी

  मज्जा आली

 2. mugdhabhide

    3 वर्षांपूर्वी

  किती मजेशीर अनुभव आले आहेत लेखकाला ........अनुभवांची जंत्री विलक्षणच

 3. Makarand

    3 वर्षांपूर्वी

  वाचस्पती टोपणनाव असणार . खरे नाव जाणण्याची उत्सुकता लेख वाचल्यावर लागली. झक्कास लेख

 4. swarupabojewar

    3 वर्षांपूर्वी

  खूप छान लेख

 5. sansal24

    3 वर्षांपूर्वी

  khup divsaani salag ek lekh vachla v manapaasun awadla

 6. VijayGokhale

    3 वर्षांपूर्वी

  Majeshir lekh.

 7. AbhayJahtap

    3 वर्षांपूर्वी

  छान लेख. तपकिरीचा दारूगोळा आपल्या नाकाच्या तोफेंत जे ठांसठांसून भरीत होते, त्यांच्या बाजूने शिकांचे गोळे सटासट् सुटूं लागले..... प्रसंग ळ्यासमोर उभा राहिला.

 8. Damodare

    3 वर्षांपूर्वी

  Very nice.

 9. Bilwadal

    3 वर्षांपूर्वी

  खूपच छान . वाचताना चित्र दिसत होते...परत वाचून आनंद क्रमप्राप्त....?वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen