इजिप्तचा सर्वांत उंच पिरॅमिड ४८० फूट उंचीचा.. तो चढून उतरायला किती वेळ लागत असेल? अबू नबी मात्र अशक्य वाटेल अशा वेळात ही कामगिरी करून दाखवायचा...
समजा ३५ मजल्याची एक इमारत आहे... प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी १०-१२ पाय-या असलेला जिना आहे, तर त्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर किती मिनिटांत पोचू शकाल? -सांगा पाहू. जिन्याच्या पाय-या चढून हं, लिफ्टने नाही! समजा प्रत्येक जिना चढायला एक मिनिट लागले तर ३५ मिनिटे लागतील ना? आणि या पाय-याही जर दोन-दोन, तीन-तीन फूट उंच असतील तर उड्या मारून चढायला जास्त वेळ लागेल ना? तुम्ही हा हिशोब करा मगच भेटा अबू नबीला. पूर्वी जगात खालील सात आश्चर्ये आहेत असे समजत- बाबिलोनियाची झुलती बाग, आलिम्पियाची देवता झियुसची भव्य मूर्ती, देवी डायनाचे मंदिर, राजा मुसोलिनीची कबर, होडस् ची सूर्यदेवतेची विशाल प्रतिमा, अॅलेक्झांड्रीचा अजब दीपस्तंभ, इजिप्तचे पिरॅमिड्स्... सातवे आश्चर्य पिरॅमिड, त्याजवळच एक आठवे आश्चर्य आहे. त्या आश्चर्याचे नाव आहे, अबू नबी. अबू नबीचा परिचय करून घेण्यापूर्वी पिरॅमिडची रचना जाणून घेऊ या. तीन पिरॅमिड्स् जवळजवळ आहेत. त्यात खुकूचा पिरॅमिड मुख्य! उंची ४८० फूट. दुरून पाहताना तो सरळ, सपाट वाटला तरी पाय-यांचे उंच थर आहेत आणि रुंदही. हे थर वरती लहान लहान होत जातात. वरती चक्क १८ फुटांचा सपाट ओटा आहे. अबू नबी पिरॅमिडच्या जवळच राहणारा. त्याने एक नवाच व्यवसाय शोधून काढला होता. असं म्हणतात की पिरॅमिडच्या आत कुबेराच खजिना आहे. पण अबूने तर हा खजिना बाहेरूनच मिळवला होता. बालपणापासूनच त्याने पिरॅमिडवर चढण्याची कसरत सुरू केली. अशक्य आणि आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याने इतका सराव केला होता की, ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .