कविराज गदिमा


गजानन दिगंबर माडगूळकर या संपूर्ण नावातील केवळ आद्याक्षरे घेऊन केलेले टोपणनाव (गदिमा) प्रसिद्ध झाले; एवढेच नव्हे तर प्रेमभराने ते पिढ्यानपिढ्या घेतले गेले. असे क्वचित घडते. या कविराजांच्या बाबतीत मात्र ते सहजपणे घडले. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 सालचा. म्हणजे आता ते असते तर 100 वर्षांचे झाले असते, तुम्हा मुलांच्या पणजोबांच्या वयाचे.  योगायोग म्हणजे गदिमांचे जिवाभावाचे मित्र सुधीर फडके ऊर्फ बाबूजी आणि पु. ल. देशपांडे ऊर्फ पुल यांचेही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या या तिघांनी आपल्या मराठी माणसांवर डोंगराएवढे उपकार केले आहेत.

संस्कार गदिमांना केवळ 58 वर्षांचे आयुष्य लाभले. यामध्ये त्यांनी किती आणि काय लिहिले हे आपण समजून घेणारच आहोत; पण हे लिहीण्याची स्फूर्ती त्यांना कशी मिळाली असेल हे आधी जाणून घेऊया. त्यांचा जन्म झाला सातारा जिह्यातील शेटफळ या एका छोट्याशा गावात, त्यांच्या आजोळी. गंमत म्हणजे जन्मतः हे मूल रडले नाही म्हणून सगळे दुःखात असतानाच सुईणीने शेवटचा म्हणून एक प्रयत्न केला, त्याला यश आले आणि बाळ रडले. आनंदीआनंद झाला. त्या सुईणीचे आपल्या महाराष्ट्राने खूप खूप आभार मानले पाहिजेत. गदिमांच्या बुद्धीची चमक लहानपणीच दिसून आली. वयाच्या केवळ पाचव्या वर्षी वडिलांनी एक बाराखडी लिहायला सांगितल्यावर या बाळाने सर्व मुळाक्षरांच्या बाराखड्या मनानेच लिहून काढल्या. पुढे केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी, संस्कृत, हिन्दी, गुजराथी, पंजाबी, उर्दू, मल्याळी, तेलुगू, कानडी या भाषाही ते शिकले. गदिमा लहानपणी खेड्यात राहिले. निसर्ग ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बालसाहित्य , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. deepa_ajay

      5 वर्षांपूर्वी

    शब्दातीत

  2. Prakash Hirlekar

      5 वर्षांपूर्वी

    तिघं।नी खरोखरच मराठी पण जोजवल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen