पिझ्झा तुम्हांला फार आवडतो ना, पण पिझ्झाचा शोध कसा लागला माहिती आहे ?
पिझ्झा म्हटलं की लहान-थोर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. काय ते वेगवेगळे टॉपिंग्ज! वा! मूळ इटालियन असलेला हा पिझ्झा आता अनेक देशांत त्यांच्या चवीप्रमाणे मिळतो. पिझ्झा नेमका कोणी पहिल्यांदा शोधून काढला याची काही इतिहासात नोंद नसली तरी पार १० व्या शतकाच्याही आधी इटलीमध्ये पिझ्झा तयार होत असे. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक प्रकारचे पिझ्झा बनू लागले. या सगळ्या पिझ्झा प्रकारांत पिझ्झा ‘मरिनारा’ आणि ‘मार्गरिता’ हे सगळ्यात आवडते प्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. आता तर पिझ्झा बेसही निरनिराळ्या प्रकारचे मिळू लागले आहेत. मूळ इटालियन पिझ्झा हा मऊसूत असतो। मरिनारा पिझ्झा हा दर्यावर्ती, कोळी लोकांचा फार आवडता प्रकार होता. तो अगदी साधा असायचा. त्यावर लसूण, ओरिगानो, टोमॅटो असे फार तर! आणि याचे हे नाव कसे पडले माहितीये? सतत समुद्रसफरीवर असलेल्या एका माणसाच्या बायकोचे नाव मरिनारा होते. तिने सगळ्यात पहिल्यांदा असा झटपट पिझ्झा बनवला आणि नवऱ्याला दिला. तेव्हापासून हा झटपट पिझ्झा नाविकांमध्ये आवडता झाला. मार्गारिटा हा पिझ्झा प्रकार १८८९ साली एका शेफने तयार केला. 'पिझझेरिया दी पित्रो' या नावाच्या बेकरीत काम करणाऱ्या राफेल एसपोसितो या शेफने इटालियन राणीसाठी हा पिझ्झा तयार केला. राजा उंबेर्तो पहिला आणि त्याची राणी मार्गारिता यांच्या आगमनाप्रीत्यर्थ त्याने तीन रंगांचे तीन पिझ्झा तयार केले. हिरवा पिझ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .