हत्तीच्या घरात छान गारवा आणि मस्त हिरवाई असते. हत्तीला हव्या असणाऱ्या गोष्टी असतात त्या घरात. काही हत्तींच्या घरात स्विमिंग पूलसुद्धा असतो...
मी जे घर तुम्हांला सांगणार आहे ते खरंच फार सुंदर आहे. लतावेलींनी सजलेलं, गोड पक्ष्यांच्या किलबिलाटाने नटलेलं, पावसाळ्यात छत्री धरणारं, उन्हाळ्यात गारवा देणारं, तर थंडीत उबदार वाटणारं. या घराला ना भिंती, ना छप्पर, ना खोल्या. पण या घरात गेलात तर माया मिळेल अगदी हत्तीएवढी. कारण हे घरच मुळात हत्तीचं घर आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटलं का? आज मी खरंच तुम्हांला हत्तीच्या घरी घेऊन जाणार आहे. एकदा जंगलात राहात असताना खुद्द हत्तीनेच मला त्याचं घर दाखवलं. झालं असं की, केरळमध्ये एकदा अचानक बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे हत्तीचं जेवण येऊ शकलं नव्हतं. मग त्याला घेऊन माहूत जंगलात निघाले. कारण हत्तीला जेवायचं होतं. हत्ती अभ्यासक म्हणून मीदेखील त्यांच्याबरोबर होतो. हत्ती जंगलात चालताना कसलाही आवाज करत नाहीत. एवढा मोठा देह, पण अगदी बाजूच्या झाडीत पाच फुटांवर असेल तरी कळणार नाही तुम्हांला. खरं सांगायचं तर जंगल कसं बघावं आणि तिथे कसं वागावं, हेच जणू मला हत्तीकडून शिकायला मिळत होतं. जेव्हा जयश्री नावाच्या हत्तीणीबरोबर मी जंगलात जात असे, तेव्हा ती चारही बाजूला गच्च झाडी असलेल्या भागात जाई. मला वाटायचं आता जंगल संपलं, पण समोर असलेल्या वेली, झाडं बाजूला करून ती आणखी आत, शांत ठिकाणी जात असे. ते ठिकाण म्हणजे छान गारवा आणि मस्त हिरवाई यांचा सुंदर मिलाफ होता. जसं तुमच्या घरात तुम्हांला हव्या असलेल्या गोष्टी असतात ना, तशाच हत्तीच्या घरातदेखील हत्तीला हव्या असणाऱ्या गोष्टी असतात . ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
gondyaaalare
6 वर्षांपूर्वीफारच सुंदर आणि वाचनीय माहिती . असंही श्रीगणपतीबाप्पा मुळे हत्ती आपल्याला जवळचा वाटतो , आवडतो .
purnanand
6 वर्षांपूर्वीवा खूपच सुंदर व कधी व वाचलेली माहिती .
Meenalogale
6 वर्षांपूर्वीफार छान.हत्तीचे घर ही कल्पनाच खूप आवडली.