नाक्यावरचा डीजे तार स्वरात किंचाळत होता. हा धिंगाणा रोजचाच झाला होता. पियूषला वैताग आला होता! त्याचा रीसर्चर मयांकदादा मदतीला धावून आला. त्याने तो आवाज बंद करणारा एक नामी उपाय शोधला!
झिंग झिंग झिंगाट... नाक्यावरचा डीजे तारस्वरात किंचाळत होता. त्याच्या तालावर बेभान होऊन गल्लीतली पोरं-पोरी नाचत होती. त्यांचा आवाजही त्यात मिसळत होता. खिडकीचं दार बंद करूनही तो पियूषच्या कानावर पडत होता. कानठळ्या बसवत होता. पियूष तसा स्कॉलर मुलगा. आज त्याचा अभ्यास होत नव्हता. वस्तीत कोणाकडेतरी साखरपुडा होता. तो वाजतगाजत साजरा करण्याच्या नादात सगळ्या गल्लीची शांतता भंग पावत होती. बरं, हा काही एका दिवसाचाच मामला नव्हता. हा धिंगाणा रोजचाच झाला होता. कधी मंगळागौर, कधी जन्माष्टमी, कधी काय आणि कधी काय - वैताग आला होता नुसता!! आता इथंच असं बसून राहण्यात काही मतलब नाही, हे त्याच्या लक्षात आलं. धाडकन घराचा दरवाजा लोटून घेत पियूष मयांकदादाकडे गेला. मयांक त्याचा मावसभाऊ. त्याच्याहून आठ-दहा वर्षांनी मोठा. तो त्याचं शिक्षण संपवून तो एका रिसर्च लॅबोरेटरीत काम करत होता. पियूषला एखादी डिफिकल्टी आली की, तो मयांकदादाच्या खनपटीला बसत असे. आताही त्यानं अशीच एखादी नवीन डिफिकल्टी आणली असावी अशी मयांकची समजूत झाली. ‘हं, बोला महाशय, काय आहे तुमचा प्रॉब्लेम,’ त्याच्या पाठीवर थाप मारत मयांक म्हणाला. एरवी ‘किती जोरानं मारतोस रे,’ असं म्हणत आपली पाठ पियूषनं चोळायला घेतली असती. पण आज काहीही न बोलता तो घुम्यासारखा बसून राहिला. तो काहीही बोलत नसला तरी आतून धुमसतो आहे, हे मयांकच्या ध्यानात आलं. मामला सीरियस होता. त्याची पाठ हलक्य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कथा
, बालसाहित्य
, विज्ञानकथा