ख्रिस्टमस पार्टी

वयम्    जोसेफ तुस्कानो    2019-12-25 12:01:20   

नाताळच्या वातावरणातील एक मनस्वी गोष्ट!

तापमापक (Thermometer) 105.5 डिग्री फॅरेनाईट ताप दाखवीत होता. तापमान (Temperature)  मोजण्यात काही चूक तर झाली नाही ना, असे जेनेटला वाटले. तिने तो तापमापक झटकून पुन्हा पारा सेट केला. परत ताप पाहिला, पण पुन्हा तेवढाच ताप! पाच वर्षांचा तिचा मुलगा अॅलेक्स तापाने फणफणला होता. हवामान बदलले की, त्याला ताप येणं ठरलेलंच होतं. चार-पाच दिवस ताप यायचा नि हळूहळू उतरून जायचा. पण यावेळेस मात्र ताप  उतरत नव्हता. जेनेटने अॅलेक्सला तापावरची पॅरासिटेमोलची गोळी दिली. त्याला स्पंज-बाथ दिला, पण पुन्हा ताप 105 डिग्री! “चिंता करू नका, त्याला दवाखान्यात घेऊन या. मला त्याला तपासू द्या,” डॉक्टर नीनांनी फोनवरून जेनेटला धीर दिला. जेनेट आणि एरिकने  अॅलेक्सला तत्काळ इस्पितळात हलवले. डॉ. नीनाने त्याची छाती तपासली व त्वरित एक्स-रे चाचणीसाठी पाठवले. त्या चाचणीतून निष्कर्ष निघाला- तो न्युमोनियाचा आजार असावा, हे डॉ. नीनांच्या लक्षात आले. “त्याला इस्पितळात ठेवावे लागेल,” त्यांनी सुचवले. “मॉम, नाताळचा सण तर पाच दिवसांवर येऊन ठेपलाय. आपण भेटवस्तू कधी खरेदी करणार? आपण घरी जाऊया का?”  अॅलेक्स थकलेल्या आवाजात त्याच्या आईला विचारत होता. इस्पितळातील कॉटवर निळ्या गाऊनमध्ये, तो निपचित पडला होता. त्याला इंजेक्शनद्वारे औषधे भरवली जात होती. आपल्या बाळाचे ते निष्पाप आर्जव ऐकून जेनेटला रडू कोसळले. हळूहळू अॅलेक्सची प्रकृती सुधारू लागली. ताप उतरू लागला. फुफ्फुसे (Lungs) साफ व्हायला लागली होती. त्याची प्रगती पाहून, डॉ. नीना समाधानी होत्या. मात्र, ख्रिस्टमसपूर्वी घरी जाता येईल, याची खात्री त्या अॅलेक्सला देऊ शकत नव्हत्या. बालरोगतज्ज्ञ असलेल्या आपल्या डॉक्टर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen