मुलांची ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता वाढायला हवी, असे कुठेतरी जाणवू लागले आहे. त्याबद्दलचे हे संपादकीय-
वयम् दोस्तांनो, ‘अजिबात ऐकायला नको...’ ‘जरा ऐकून घेत नाही...’ अनेकदा पालक मंडळी तुम्हां मुलांबद्दलच्या अशा तक्रारी सर्रास करत असतात. तुम्हांला अशावेळी किती वैताग येत असेल, याची कल्पना आहे आम्हांला! आम्हांलाही नकोसे वाटतात हे कमेंट्स. एकतर, असे चित्र सार्वत्रिक नाही, हे आम्हांला ‘बहुरंगी बहर’चे प्रत्येक पर्व जाणवून देते. आम्ही अभिमानाने सांगतो की, ‘वयम्’ची मुले वेगळी आहेत! अलीकडेच ‘बहुरंगी बहर’चे चौथे पर्व झाले. शहाण्या मुलांची आणखी एक गँग ‘वयम्’च्या कुटुंबात सामील झाली आहे. मात्र एकंदरीत मुलांची ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता वाढायला हवी, असे कुठेतरी जाणवू लागले आहे. अलीकडे ‘बहुरंगी बहर’ स्पर्धेच्या गटचर्चेच्या वेळी हे प्रकर्षाने जाणवले. काही मुले दुसऱ्यांना बोलू न देता स्वत:चे घोडे पुढे दामटत होती. काही जण प्रत्येक शब्द नीट लक्षपूर्वक ऐकून, त्याचा अर्थ समजून घेण्यात कमी पडत होते. काही जणांच्या बोलण्यात आत्मविश्वास ठासून भरला होता, पण मुद्दे किंवा आशय यांची उणीव होती. काहींना आपले मुद्दे योग्य शब्दांत मांडताना अडचण येत होती. गट-चर्चाफेरीत ‘चित्र बघून लेखन’ करताना फार कमी मुले त्या चित्रावर विचार करून काहीतरी म्हणणे मांडू शकली. बहुतांश मुले त्या चित्रात काय काय आहे, याचे वर्णन करण्यात रेंगाळली; स्वत:च्या कल्पना, भावना, विचार मांडण्यापर्यंत पोचली नाही. म्हटले तर हा प्रश्न सोपा होता, पण तोच जमला नाही अनेकांना! एकीकडे तुम्हां मुलांसमोर मीडिया आहे- तो अनेक रूपांत आहे. टीव्ही, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, त्यावरील अॅप अशा अ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
bookworm
6 वर्षांपूर्वीवा! बहुरंगी बहर च्या सदरमध्ये माझ्या मुलीला सामिल होता येईल का?
किरण भिडे
6 वर्षांपूर्वी9152255235 या क्रमांकावर संपर्क साधा
6 वर्षांपूर्वी
मी पुनश्च चे सदस्यत्व घेतले आहे.