प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. औरंगाबादच्या आकाश खिल्लारे आणि मुंबईच्या झेन सदावर्ते या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार आहे. झेन सदावर्ते हिच्यावरील विस्तृत लेख २०१८ च्या वयम् दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. भन्नाट आहे ही मुलगी. फक्त शूर नाही, प्रचंड हुशारही आहे. वाचा तिच्याबद्दल-
२२ ऑगस्ट २०१८ ला मुंबईतील ‘क्रिस्टल टॉवर’ या इमारतीत आग लागली होती, तेव्हा टीव्हीवर दाखवलेल्या बातम्यांत एका मुलीचे कौतुक झाले होते. झेन सदावर्ते या ११ वर्षांच्या हुशार मुलीच्या धिटाईमुळे तिचे कुटुंबीय आणि शेजारी यांचे प्राण वाचले होते. बातमी वाचताच झेनला मी भेटले. भन्नाट मुलगी आहे ही! अतिशय चुणचुणीत, झुंजार आणि मदतशील!! इमारतीत आग लागली, घरात धुराचे लोळ आले, पूर्ण घर कार्बन डायऑक्साइड वायूने भरून गेले. अशात झेनने न घाबरता हाताला लागले ते सुती कपडे ओले करून स्वत:च्या तोंडाभोवती गुंडाळले. तिच्या आई-वडिलांना आणि शेजार्यांनाही असे करण्यास सांगितले. त्या सर्वानी चादर, ओढणी वगैरे ओले करून नाका-तोंडाभोवती गुंडाळल्यामुळे दुषित वायू नका-तोंडात जाऊन ते सर्वजण गुदमरले नाहीत. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप सोडवले. आगीनंतर झेन जेव्हा दूरचित्रवाणीवर झळकली, तेव्हा ती कॅमेरासमोर अतिशय शांतपणे बोलली. हे सर्व का, कसे केले याचे शास्त्रीय कारण तिने सांगितले. ‘ओल्या कपडामुळे कार्बनयुक्त धूर गाळून नाकात जातो. आगीच्या वेळी अशा रीतीने हवा गाळून घ्यावी, हे मला माहीत होते. मला माझ्या टीचरने तीन वर्षांपूर्वी हे शिकवले होते.’ झेनचे वाचन अफाट आहे. ती BBC News नियमितपणे प ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .