१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.
एकदा संध्याकाळची वेळ होती. आकाशात चंद्रकोर चमकत होती. देवघरात मुले डोळे मिटून बसून होती. खोलीच्या कडेकडेने एक नाग सरपटत जात असल्याचे एका मुलाने पाहिले. तो घाबरून ओरडला. बाकीची मुलेही सापाला पाहून घाबरली. परंतु त्यातील एक मुलगा मात्र किंचितही हलला नाही. तो ध्यानात मग्न होता. मुलांनी त्याला हाका मारल्या. परंतु काही उपयोग झाला नाही. मुलांनी धावत जाऊन त्याच्या आई-वडिलांना बोलावले. एव्हाना त्या नागाने फणा पसरला होता. सारी मुले खिळून बसली होती. पण काही वेळातच तो साप सळसळत निघून गेला. हे सगळे ऐकल्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला, “मला नाग वगैरे काही कळलं नाही. मला कसला तरी खूप आनंद होत होता.” वयाच्या सहाव्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला. पहिला दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याला या दिवशी पहाटे त्याच्या घरातील पुजारींनी काही पूजा, संस्कार करण्यासाठी बोलाविले होते. शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने हा विद्यारंभ होता. त्याची घरची सारी मंडळी उपस्थित होती. पुजारींनी काही मंत्र म्हटले. या नव्या विद्यार्थ्याला सरस्वतीच्या ठायी अर्पण केले. सरस्वती म्हणजे ज्ञानदेवता मानली जाते म्हणून! मग त्यांनी रामखडी नावाचा लालसर खडू त्याच्या उजव्या हातात ठेवला आणि त्याचे बोट धरून पाटीवर अक्षरे गिरविली. शाळेत जाताना त्याने नवे कोरे धोतर नेसले होते. बगलेत बैठकीची गुंडाळी होती. कमरेला लांब दोरी बांधलेली बोरूची लेखणी लोंबकळत होती. हे सर्व त्या मुलाला खूप छान वाटत होते. या मुलाची स्मरणशक्ती तीव्र होती. आईनेच त्याला ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
5 वर्षांपूर्वीछान!