स्मार्ट ग्राहकांसाठी!

वयम्    मंगला गाडगीळ    2020-03-14 10:00:51   

१५ मार्च हा दिवस जगभर जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या स्मार्ट ग्राहकांसाठी या टिप्स-

  एका शाळेत घडलेली ही घटना! शाळेतल्या दोन दांडगट मुलांची आपापसांत पैज लागली की, जास्त दांडगट कोण? जो कोणी आपल्या वर्गातील एकाला धक्का मारून खाली पाडेल तो खरा दांडगट!.. मग पैज लावलेल्या मुलांनी काय केलं? – वर्गातल्या, स्वभावाने खूपच गरीब असणाऱ्या एका मुलाला लक्ष्य केलं. त्याला उगीचच धक्का मारला. नेमकं हेच इंटरनेट वापरताना सरळ स्वभावाच्या मुला-मुलींबाबत घडू शकतं.  आपल्यापैकी बरेच जण इंटरनेट वापरत असता; मात्र त्यातील धोके मात्र अनेकांना माहीतच नसतात. समजा, त्या गरीब मुलाला आधीच समजले असतं की आपल्या बाबतीत असं काही घडणार आहे, तर त्याने काय केलं असतं? तो त्या दांडगट मुलांपासून दोन हात लांबच राहिला असता. आपण इंटरनेट वापरताना हेच केलं पाहिजे. शाळेतल्या प्रोजेक्टसाठी किंवा एखाद्या विषयाची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करताना ज्या वेबसाइटवर जाता ती सुरक्षित आहे किंवा नाही ते तपासायचं. त्या वेबसाइटच्या नावाअगोदर कुलपाचं चित्र आणि https असं लिहिलेलं असलंच पाहिजे. त्यातील s म्हणजे सुरक्षित. कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हांला इमेल किंवा स्मार्टफोनवर सतत मेसेज पाठवत आहे का? तर सावधान. एखादी लिंक उघडण्यासाठी सूचना असेल तर तो मेसेज खोटा आणि घातकी असू शकतो. ऑनलाइन गेम खेळताना झटपट पैसे मिळवणे हाच उद्देश असतो. ऑनलाइन गेम खेळायचं आमंत्रण तुम्हांला येऊ शकतं. ही व्यक्ती कोणत्याही देशातील असू शकते. अनेकदा अशी व्यक्ती गोड गोड आणि भुरळ पाडणारे संभाषण करते. तुम्ही फसले जाण्यासाठी, ते असे मधाळ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen