नैसर्गिक रंगात रंगलो आम्ही!


रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१५ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त-

रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते. हा निसर्ग म्हणजे रंगाचा कारखाना आहे असं वाटतं. रंग हा आपला आवडीचा प्रकार. होळीच्या वेळी आपण विविध प्रकारच्या रंगाची उधळण करतो. परंतु आजकाल या रंगांमुळे शरीराला हानी पोहचलेल्याच्या बातम्याही आपणाला वाचायला मिळतात. हो ना ! असं का होतं बरं? मग चांगले रंग कोणते? आजकाल ‘इको फ्रेंडली’ रंग वापरण्याचा सल्ला आपणाला अनेकदा ऐकायला मिळतो. परंतु हे ‘इको फ्रेंडली’ रंग म्हणजे नक्की कोणते रंग आणि हे बनतात कसे? शिवाय हे हानिकारक का नसतात? ...आमचे हे कुतुहूल दूर झाले ते ‘वयम्’च्या उद्योग भेटीमुळे. रंग विशेषांक असल्याने यावेळी ‘इको फ्रेंडली’ रंग बनवणाऱ्या कंपनीला आम्ही भेट दिली. या कंपनीचं नाव होतं ‘लेजर मॅजिक कलर’. अंधेरी येथे या कंपनीचं ऑफिस होतं. या कंपनीची मुख्य फॅक्टरी अहमदाबाद येथे आहे. ‘लेजर मॅजिक कलर’ कंपनीची माहिती आम्हांला तेथील शास्त्रज्ञ राजा पटवर्धन काकांनी दिली. राजा पटवर्धन काकांनी आमचं स्वागत केलं आणि आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आम्हांला कागदापासून बनवलेल्या गणपती बा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , बालसाहित्य , उद्योग , पर्यावरण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen