शूरवीर आकाश


राष्ट्रीय शौर्य पुरस्कार या वर्षी दोन मुलांना मिळाला. त्यांपैकी एक, आकाश खिल्लारे आणि दुसरी, झेन सदावर्ते. झेनच्या कर्तबगारीची कथा आपण 'वयम्' मासिकाच्या २०१९च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केली होती. ती आता https://wayam.in/zen-sadavarte.html या लिंकवर वाचायला मिळेल. या अंकात आपण जाणून घेऊया, आकाश खिल्लारे याच्या शौर्याबद्दल- औरंगाबाद शहरापासून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या लाड-सावंगी परिसरात हातमाळी नावाचे गाव आहे. या गावातील आकाश मच्छिंद्र खिल्लारे हा किशोरवयीन मुलगा सध्या बातमीचा विषय ठरलेला आहे. स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता या मुलाने २२ जानेवारी २०१९ रोजी दुधना नदीत बुडणाऱ्या मायलेकींना वाचविले आणि २६ जानेवारी २०२० रोजी आकाश मच्छिंद्र खिल्लारे याला राष्ट्रीय ‘बाल शौर्य पुरस्कार’ देऊन लेफ्टनंट कर्नल रामेश्वर रॉय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी आकाश दहावी उत्तीर्ण झाला आणि आता तो औरंगाबादला ITI चे शिक्षण घेत आहे. तो पहिली ते आठवी त्याच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत होता, तर नववी-दहावी नायगाव उच्च माध्यमिक शाळेत शिकत होता. या शौर्य पुरस्काराचा भाग म्हणून आकाशला शौर्यपदक, प्रशस्तिपत्रक, आणि वीस हजारांचा धनादेश देण्यात आला. तसेच त्याला पुढील शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत आणि सुविधाही दिल्या जाणार आहेत. हा सन्मान सोहळा बघून आकाशचे वडील मच्छिंद्र खिल्लारे, आई रमाबाई, आजोबा पंढरीनाथ, आजी धगणाबाई, तसेच बहीण जया, छाया यांच्यासह संपूर्ण खिल्लारे परिवार आनंदित झाला आहे. ग्रा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्तिविशेष , प्रासंगिक , बालसाहित्य

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen