उन्हाळी सुट्टी आणि आनंदाचा बहर

वयम्    स्वरूपा वकनाली    2019-04-12 10:10:19   

उन्हाळी सुट्टी म्हणजे भरपूर मोकळा वेळ. एरवी शाळा आणि अभ्यास या रुटीनमध्ये अनेक गोष्टी करायच्या राहून जातात ना! अगदी घरच्यांशी पोटभर गप्पा मारायलाही वेळ मिळत नसेल कधीकधी. सुट्टीत ही सगळी कमतरता भरून काढा. या काळात तुम्ही, तुमचे मित्रगण आणि तुम्हा सर्वांचे पालक मिळून काही गोष्टी गटाने करून बघा. या निसर्गरम्य ऋतूत आनंदाचा बहर अनुभवा. त्यासाठी हा खास लेख.. मुलांसह पालकांनी वाचावा असा! यातून तुम्हांला तुमच्या सुट्टीत आनंदाचा बहर अनुभवण्याच्या विविध कल्पना कळतील. आणखीही काही सुचतील! आणि तुमची सुट्टी अविस्मरणीय होईल. आमची मुले लहान असताना आम्ही काही समविचारी पालकांनी मिळून प्रत्येक सुट्टीत काही प्रयत्न केले होते. आपापल्या मुलाबद्दल सजगतेने विचार करून कुठल्या गोष्टी करायच्या हे आम्ही ठरवायचो. जमल्यास त्याचा एकत्र बसून चार्ट तयार करायचो. या सर्व गोष्टींमध्ये पालकांनी आवडीने सहभागी होणे अतिशय आवश्यक आहे. हे केल्याने मुलांचे आणि पालकांचे एकमेकांबरोबरचे नाते अधिक पोषक करता येते. सुट्टीत आजोळी किंवा नातेवाईकांकडे मुले एकत्र जमतात, तेव्हा काही खेळांमध्ये पालकांचा सहभाग असावा. त्यामुळे मुले-पालक नात्यात खेळकरपणा येऊन वयाचा अडसर (Generation gap) कमी होतो. आसपासची मुले सुट्टीत ठरवून एकत्र येणे, एकत्र राहणे असेही करू शकतात. सर्वांनी मिळून सुट्टीचा आनंद एकत्र घेण्याने पुढील आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर (अगदी ताणाच्या अवस्थेतही) आनंदाने कसे जगायचे, हे तुम्हा मुलांना समजते.  

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , पालकत्व , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen