मोठ्या मुश्किलीने मिळालेली सायकल पहिल्याच दिवशी चोरीला गेल्यावर, एका माणसाने व त्याच्या लहानग्या मुलाने ती सायकल शोधण्यासाठी किती वणवण केली याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट जरूर बघा. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की, सिनेमा म्हणजे करमणूक, आणि तेही काही खोटं नाही. करमणूक हा सिनेमाचा एक हेतू असतोही. पण आपण कशाला करमणूक म्हणायचं हा देखील एक प्रश्न आहेच. आता आपण गोष्टींची पुस्तकं वाचतो, ती काही सगळी हसायला लावणारी किंवा साहसकथा सांगणारी नसतात. साने गुरुजींपासून मुलांसाठी लिहिणाऱ्या अनेक लेखकांनी गंभीर वृत्तीच्या आणि भावनांना आवाहन करणाऱ्या कथा कादंबऱ्या लिहिल्याच की! पण साहित्यात आपण आपलं मन गुंतेल अशा सगळ्यालाच करमणुकीच्या एका विस्तृत व्याख्येत बसवतो. याउलट सिनेमा म्हटलं की, हसणं, अॅक्शन, स्पेशल इफेक्ट्स अशी काहीतरी ढोबळ गोष्ट आपल्याला आवश्यकच वाटते. खरं म्हणजे असं होण्याची गरज नाही. एकदा का सिनेमा म्हणजे फक्त करमणूक, हे विधान आपण अमान्य केलं, की आपल्यासमोर सिनेमाच्या ज्या अनेक वाटा खुल्या होतात त्यातली एक म्हणजे वास्तववादी सिनेमा. सिनेमातला वास्तववाद अनेक देशांनी वापरला. याची थोडक्यात व्याख्या म्हणजे जीवनाबद्दलच्या निरीक्षणातून येणारा सिनेमा. यात उघड नाट्यपूर्ण घटना नसतातच असं नाही. पण ज्या असतात त्या कृत्रिम पद्धतीने, गोष्ट तयार करायची म्हणून घडवलेल्या नसतात, तर आयुष्यात जे घडण्याची शक्यता आहे, त्यातल्याच काही घटकांना हे चित्रपट वापरून पाहतात. खूप काही गुंतागुंतीच्या गोष्टींची यांना गरज नसते. एखादी कल्पना, एखादा प्रसंग आणि त्यातून येणाऱ्या शक्यता यांचा वापर अशा चित्रपटांमधे प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ, एखादी आपल्या जवळची, आपल्याला महत्त् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .