शब्दांच्या पाऊलखुणा – सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग – दहा)

“भेटणे – मिळणे या क्रियापदांच्या अर्थाशी काहीएक साम्य असणारे ‘आढळणे’ हे आणखी एक क्रियापद आहे. ‘आढळणे’चे कोशातले अर्थ स्थिर होणे, भेटणे, दिसणे, सापडणे, गवसणे, लक्षात येणे असे आहेत. मात्र प्रमाणभाषेत हे क्रियापद सर्वसाधारणपणे ‘सापडणे’ इतक्याच मर्यादित अर्थाने वापरले जाते. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली – सातारा या पट्ट्यात ‘आढळणे’ हे क्रियापद व्यक्ती भेटणे, दिसणे या अर्थाने आजही सर्रास वापरले जाते.” भेटणे – मिळणे – आढळणे या क्रियापदांच्या व्युत्पत्तिविषयी आणि त्यांच्या पर्यायी वापराविषयी सांगतायत साधना गोरे –

————————————————————————-

गेल्या लेखात आपण भेट – भेटणे या शब्दांचे मूळ, त्यांचे कोशगत अर्थ यांविषयी चर्चा केली. (आधीचा लेख – शब्दांच्या पाऊलखुणा – पैसे भेटले? (भाग – नऊ)‘भेटणे’ या शब्दात जवळ येणे, एकत्र येणे अशा अर्थच्छटा स्पष्ट करताना गीतकार ग. दि. माडगूळर आणि जगदीश खेबूडकर यांच्या गाण्यांची उदाहरणे पाहिल्याचे तुम्हाला आठवत असेल. या दोन गीतकारांच्या दोन गाण्यांतून नदी सागराला मिळते तशी भेटतेही, हे पाहिले होते. यावर कुणाला असेही म्हणता येईल की, आपल्या लोकसंस्कृतीत नदी, सागर हे सजीव असतात आणि अशा लोकगीतांमधील भाषेचा वापर लक्ष्यार्थाने – व्यंग्यार्थाने घ्यायचा असतो. तसा तर भाषेचा सगळाच वापर लक्ष्यार्थानेच घ्यायचा असतो, नाही का?

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – पैसे भेटले? (भाग – नऊ)

शब्दांच्या पाऊलखुणा – खुंटा धरला म्हणजे ओवी येते! (भाग आठ)

काय आहे ‘मराठा’ शब्दाचा इतिहास?

‘मिळणे’ या क्रियापदाच्या कोशांतील अर्थांमध्ये सापडणे, हस्तगत होणे, प्राप्त होणे, भिडणे, भेटणे, आढळणे, एक होणे, एकत्रित येणे, एकमत होणे, युती होणे असे अनेक शब्द दिलेले दिसतात. ‘भेटणे’ क्रियापदाप्रमाणे ‘मिळणे’ क्रियापदाचे मूळही संस्कृत भाषेत आहे. संस्कृतमधील ‘मिलति’ या शब्दात मिळणे क्रियापदाचे मूळ असल्याचे कृ. पां. कुलकर्णी म्हणतात. मिसळ, मिसळणे हे शब्दही संस्कृतमधील ‘मिलन’ आणि मराठी ‘मिळणे’ याच साखळीतील आहेत, कारण एकत्र येणे, एकजीव होणे हा त्यातील धागा समान आहे. वि. का. राजवाडे यांनी त्यांच्या

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

 1. dabhay

  सजीवांची भेटणे आणि मिळणे यातील अर्थबोध झाला ।
  अप्रतिम लेख धन्यवाद।

 2. pgovind

  प्रसंगानुसार होतअसलेला शब्दाचा वापर त्यातूनच त्याच्या अर्थाच्या छटा वृद्धींगत होतात.

 3. Anonymous

  आढळणे शब्दाचे अगदी नेमके विश्लेषण.

 4. nehasawant

  खूपच उपयुक्त आहे हा लेख

 5. nehasawant

  खूपच सुंदर लेख. अनेक क्रियापदे, शब्द चुकीच्या अर्थाने वापरले जातात, त्याकडे या लेखामुळे लक्ष जाईल

Leave a Reply