नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग तीन)

“शिकवून झाल्यावर मास्तर फुले चुरगळून फेकून देतात. त्यांनी दिलेले नीरस ज्ञान मुलांच्या पचनी पडत नाही. ती जांभया देऊ लागतात. ‘कळलं आता नीट?’ असा प्रश्न विचारून आणि मुलांना सर्व काही समजलयं, अशी स्वतःची समजूत काढून मास्तर निघून जातात. या संग्रहातील छोट्या – छोट्या कथांतून आपल्या शाळांमधले चेतनाहीन वर्गच जणू जिवंत झाले आहेत.” आचार्य प्र. के. अत्रेे यांच्या समृद्ध बालसाहित्याचा क. जे. सोमय्या महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्या डॉ. वीणा सानेकरांनी घेतलेला हा आढावा – 

—————————————————————-

आचार्य अत्रे यांचे मला आवडलेले  मुलांसाठीचे आणखी एक पुस्तक म्हणजे ‘फुले आणि मुले’. हे पुस्तक जितके मुलांकरता आहे, त्याहीपेक्षा जास्त ते मोठ्यांकरता आहे. या पुस्तकात छोटया-छोटया गोष्टी आहेत. त्यातल्या सहा गोष्टी थेटपणे आपल्या शिक्षणव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.

‘ठोकळ्याचे चित्र’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक वर्गात येतात. आणि ठोकळयाचे चित्र मुलांनी काढावे म्हणून टेबलावर एक ठोकळा ठेवतात. लहान मुलांना अनेकदा ‘अमुकच चित्र काढ’ असे म्हटलेले आवडत नाही. त्यांना स्वतःच्या मनाने, मर्जीनुसार चित्रं काढायची नि रंगवायची असतात, मात्र ‘गुरुजी, फूल काढू का?’ असे म्हणणाऱ्या एका बारकुळया मुलाची वर्गात फजिती होते. इतक्यात वर्गातल्या दत्तू सानेची तक्रार एक मुलगा करतो.

हेही वाचा – नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग एक)

–  नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग दोन)

सकाळपासून बसून दत्तूने एक सुंदर निसर्गचित्र काढलेले होते. त्याच असीम आनंदात दत्तू होता. स्वतःच्या कलाकृतीवर तो प्रचंड खूश होता. त्या आनंदाच्या तंद्रीत ठोकळ्याचे चित्र काढायचे भानच त्याला उरले नाही, पण या आनंदाची फार मोठी किंमत दत्तूला दयावी लागली. गुरुजींनी त्याच्या त्या सुंदर चित्राचे फाडून तुकडे केले. दत्तूला ओरडणाऱ्या गुरुजींच्या तोंडी जे उद्गार आहेत, ते  दांभिक मानसिकतेचे दर्शन घडवतात. गुरुजी म्हणतात, “स्वतःचे डोके चालवतोस? ठोकळा काढायला सांगितला, तो सोडून भलताच उद्योग करीत बसलास? कुणी सांगितलं तुला हे

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 6 Comments

 1. dabhay

  एवढे आधीपासून शिक्षण पद्धतीत अजून बदल नाही हे कोणाचे अपयश?

  1. साधना गोरे

   शासन, शिक्षक, पालक असं सगळ्या समाजाचंच अपयश म्हणावं लागेल.

 2. nehasawant

  खूपच सुंदर लेख, संस्कार मूल्यांची जाणीव करून देणारा.

 3. vranjita

  आपल्या शालेय व्यवस्थेविषयी डोळ्यात अंजन घालणारा लेख.

 4. pvanashri

  सहज आणि सुटसुटीत मांडणी. छान.

 5. Anonymous

  ओघवत्या शैलीत मस्त आढावा

Leave a Reply