fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

शब्दांच्या पाऊलखुणा – पैसे भेटले? (भाग – नऊ)

मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार ग. दि माडगूळकरांचं एक गाणं आहे – ‘नदी सागरा मिळते, पुन्हा येईना बाहेर, जग म्हणते कसे गं, नाही नदीला माहेर’ या गाण्यात नदी सागराला मिळते, भेटत नाही. मराठीतील तितकेच तोलामालाचे आणखी एक गीतकार जगदीश खेबूडकर. त्यांच्या ‘घागर घुमूंदे घुमूंदे, रामा, पावा वाजू दे’ या मंगळागौरीच्या गाण्यात शेवटच्या ओळी अशा आहेत – ‘जीव लावून जिवाचा, टिळा लाविते रक्ताचा, आता म्होरल्या जल्मात नदी भेटू दे सागरा’. या गाण्यात नदी सागरात मिळत नाही, तर भेटते. या दोन्ही गाण्यांतील नदी आणि सागर यांच्या उदाहरणात भेटणे आणि मिळणे हे शब्द एकमेकांऐवजी वापरलेले दिसतात.

—————————————————————–

“मॅडम, मला पुस्तक भेटलं” वर्गातली एक विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने आपल्या शिक्षकाला सांगत असते. त्यावर शिक्षकाचं  स्पष्टीकरण  – ‘अगं, पुस्तक निर्जीव वस्तू, ते भेटेल कसं? माणसं भेटतात; पुस्तक मिळतं, सापडतं.’ हाच विषय संवादाच्या विविध तपशिलाने आपण ऐकला असेल किंवा स्वतःही अशा संवादात सहभागी झाला असाल. भेटणे, मिळणे, सापडणे ही मराठीत सर्रास वापरली जाणारी क्रियापदे आहेत. विशेषतः भेटणे आणि मिळणे ही क्रियापदे एकमेकांच्या ऐवजीही वापरलेली दिसतात.

मराठीतील उपलब्ध शब्दकोश शब्दांचे पर्याय म्हणजे समानार्थी शब्द सुचवतात, मात्र त्यात शब्दांची वाक्योपयोगी उदाहरणे तुरळक दिसतात. ही उदाहरणे तुरळक असली तरी ‘भेटणे आणि ‘मिळणे’ या क्रियापदांच्या अर्थाबाबत, वापराबाबत शब्दकोशांतली माहिती वरील स्पष्टीकरणापेक्षा काही वेगळं सांगू पाहते. ‘भेटणे’ या

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. नदी भेटते हे कसं काय बरोबर आहे ते तुम्ही नाही सांगितलं

    1. टिपरेसाहेब,
      नदी भेटते असं मी नाही म्हटलं, तर ते खेबूडकरांनी त्यांच्या गाण्यात म्हटलंय, असं मी सांगितलं आहे.

  2. अर्थपूर्ण माहिती

  3. साधना मँडम ,अतिशय अभ्यासपूर्ण व उपयुक्त लेख.यामुळे मराठीतील अनेक शब्दांची व्युत्पत्ती/ अर्थ, नवीन शब्दकोश , इत्यादींचा परिचय झाला. आपली मराठी भाषा आहेच एवढी सर्वसमावेशक ,की अपवादात्मक परिस्थितीतीतही ती शब्दांना लवचिक तेने हाताळते,असे मला वाटते.

Leave a Reply

Close Menu