शब्दांच्या पाऊलखुणा - टाळेबंदी (भाग अकरा)


"गंमत म्हणजे ‘टाळा’ म्हटलं की अनेकांना हा शब्द हिंदी वाटतो अन् त्याला समानार्थी असणारा शब्द ‘कुलूप’ मराठी वाटतो. पण ‘कुलूप’ हा मूळ अरबी भाषेतील शब्द, जो फारसीद्वारे मराठीत आला आणि रूढ झाला. कुलूप आणि कुल्फी हे दोन्ही शब्द ‘कुल्फ’ या अरबी शब्दापासून तयार झाले आहेत." सध्याच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर  टाळा, कुलूप या शब्दांच्या व्युत्पत्तीविषयी सांगतायत साधना गोरे -  

------------------------------------------------------------

आधी चीन मग इटली मग युरोप असं करत करत आज सगळं जगच करोनाग्रस्त होऊन बसलं आहे. चीनच्या धर्तीवरच मग संबंधित देशांनी आधी करोनाग्रस्तांचे विलगीकरण अन् मग सबंध देशात टाळेबंदी लागू केली. इंग्रजीतील ‘लॉकडाऊन’ शब्दाला आपल्याकडे आधीच वेगळ्या संदर्भात प्रचलित असलेला ‘टाळेबंदी’ हा समर्पक शब्द सतर्क माध्यमांनी लगोलग वापरला. संप हे जसं कामगारांचं शस्त्र आहे, तसं टाळेबंदी हे कामगारांना ताब्यात ठेवण्यासाठी कारखानदारांकडून हत्यार म्हणून वापरलं जातं. पण टाळेबंदीपेक्षा आजवर वेगवेगळ्या निमित्ताने झालेलेल 'भारत बंद',  'महाराष्ट्र बंद' आपल्याला अधिक परिचित आहेत.

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग – दहा)

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , भाषा

प्रतिक्रिया

 1. kmrudula

    12 महिन्यांपूर्वी

  लेख खूप छान आहे, मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. पहिल्या पासून सगळे लेख वाचायचे आहेत

 2. avinaya

    12 महिन्यांपूर्वी

  छान मॅडम कुलुप आणि टाळा यादोन्ही शब्दांचा अर्थ खुपच छान पद्धतीने मांडले आहेत.

 3. vshankar

    12 महिन्यांपूर्वी

  खूप छान. ललित लेखनाच्या अंगाने जाणारे लेखन वाचकांना उत्सुकते सोबतच भरीव ज्ञानात भर पडते. कुतुहल,रंजन आणि उपयुक्तता सिद्ध करणारा लेख.अभिनंदन.

 4. pvanashri

    12 महिन्यांपूर्वी

  छान माहिती

 5. साधना गोरे

    12 महिन्यांपूर्वी

  दीपाताई, या लेखातच 'हेही वाचा'च्या खाली मागील लेखाच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही मागचे लेख वाचत जाल, तसे त्याच्या मागच्या लेखांच्या लिंकही तिथेच दिलेल्या दिसतील.

 6. dabhay

    12 महिन्यांपूर्वी

  तुमच्यामुळे माझ्या डोक्यात भाषेचा बाबतीत बराच प्रकाश पडतोय। समृद्ध होतेय भाषा। धन्यवाद लाखमोलाचे

 7. Deepapalshikar

    12 महिन्यांपूर्वी

  खूप छान लेख आहे. दहावीच्या पुस्तकात व्युत्पत्ती कोशावर एक पाठ आहे, त्यासाठी मला या लेखाचा उपयोग होईल. या मालिकेतील बाकीचे लेख कुठे वाचायला मिळतील?

 8. Rdesai

    12 महिन्यांपूर्वी

  खुप छान लेख !

 9. kbharamu

    12 महिन्यांपूर्वी

  अभ्यासपूर्ण लेख.

 10. Anil

    12 महिन्यांपूर्वी

  कुलुप , टाळा शब्दांचा मराठीसह वेगवेगळ्या भाषांतील वापर, थोडक्यात पण छान माहितीवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen