गेल्या 'टाळेबंदी'च्या लेखात आपण टाळा-चावी या जोडीगोळीतील टाळ्याचा गोतावळा पाहिल्याचं तुम्हाला आठवत असेल. आज आपण टाळ्याच्या जोडीदारीची म्हणजे किल्लीचा गोतावळा समजून घेऊ. किल्ली किंवा चावी म्हणजे कुलूप उघड-बंद करण्याचं साधन. यातील ‘चावी’ शब्द हिंदी वाटला तरी त्याचं मूळ ‘चावे’ या पार्तुगीज शब्दात आहे. या ‘चावे’चं बंगालीत ‘साबी’, तमिळमध्ये ‘सावी’, अन् हिंदीमध्ये झालं चाबी/चाभी! कुलूप उघड–बंद करण्यासाठी किल्ली कुलपात घालून विशिष्ट प्रकारे म्हणजे डावीकडून उजवीकडे फिरवावी लागते. अशीच काहीशी क्रिया पाण्याचा नळ चालू – बंद करतानाही आपण करत असतो. यावरूनच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात नळाला ‘चावी’ म्हटलं जात असावं.
हेही वाचा :-
शब्दांच्या पाऊलखुणा – टाळेबंदी (भाग अकरा)
शब्दांच्या पाऊलखुणा – सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग – दहा)
‘चावीचा दगड’या कल्पक वाक्प्रयोगाचा हल्ली फारसा वापर होताना दिसत नाही. दगडांची कमान बांधताना मधोमध जो दगड बसवला जातो त्याला ‘चावीचा दगड’ म्हटलं जातं. हा दगड घडवणं आणि तो कमानीत बसवणं ही दोन्ही कामं फार कौशल्याची समजली जातात. कारण हा चावीचा दगड केवळ शोभेसाठी नसतो, तर आख्ख्या कमानीचा भार हा चावीचा दगड पेलत असतो. कमानीतील सर्व दगडांना एकमेकांत घट्ट अडकवण्याचे म्हणजे एक प्रकारे बंद करण्याचे काम एखाद्या चावीप्रमाणे हा मध्यभागातला दगड क ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
lvinod
5 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण व वैचारिक बैठक असणारा लेख......👍
Rdesai
5 वर्षांपूर्वीसुंदर माहिती !
vrudeepak
5 वर्षांपूर्वीउत्तम माहिती. अनेकांना हे माहीत नसेल, मराठीतील "दहा" या शब्दाची उत्पत्ती फारसीतुन झालीत पण उर्दूतील "दस" हा शब्द संस्कृतातील आहे.
dabhay
5 वर्षांपूर्वीअप्रतिम
Rupalikamble
5 वर्षांपूर्वीछान माहिती.