नियतकालिक अंतरंग कशासाठी ?

सध्या माहितीच्या समुद्रात आपण जगतो आहोत.व्हाटस अप ,फेसबुक वर माहिती देणारे असंख्य लेख चकटफू वाचायला मिळत आहेत. मात्र त्यातील कोणती माहिती खरी आहे हे समजणे अवघड झाले आहे.अनेकदा चुकीची माहिती प्रसिद्ध व्यक्तीचे नाव लेखक म्हणून लिहून पसरवली जात आहे. या सोशल मिडिया वर आपण जे काही वाचतो त्याला विषयांचे काहीही बंधन नसते.सिनेमा वरील एखादा लेख वाचून होत नाही तेवढ्यात मेंदूची माहिती देणारा व्हिडीओ येऊन पडलेला असतो.आणि अशी विविध प्रकारची माहिती सलग घेतल्याने  आपला मेंदू भंजाळून जातो.

 

 माहिती अपरिमित आहे ,अनंत आहे मात्र आपला मेंदूचा कटोरा लहान आहे.माहितीवर प्रक्रिया करायला देखील त्याला थोडा वेळ लागतो, तो देखील आज मिळत नाही.त्यामुळे माहितीचा उपयोग दूर राहींला , ती स्मृतीत साठवली देखील जात नाही.महापुरात पाणी येते आणि वाहून जाते तसेच माहितीचे होत आहे.त्याच मुळे तेच तेच मेसेज पुनःपुन्हा पुढे पाठवले जातात आणि आपण देखील ते पुनःपुन्हा वाचतो,पाहतो.या माहितीचा उपयोग रोजच्या आयुष्यात फारच कमी होतो.

हे टाळायचे असेल तर विशिष्ट विषयाची निवडक आणि सत्य माहिती मिळवायला हवी. ती वाचून झाली की त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मेंदूला वेळ द्यायला हवा.तेवढ्या वेळात दुसरी माहिती मेंदूला देण्याचे टाळायला हवे. असे केले तर त्या माहितीचे ज्ञानात रुपान्तर होईल.त्यानंतर ते ज्ञान उपयोगात आणले तर आयुष्य अधिक सुंदर होईल,स्वास्थ्य अनुभवता येईल

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. vinayakbapat

    छान आहे.

Leave a Reply