हस्ताचा पाऊस आणि मुम्बईचा वारा, ट्रॅम पकडण्यासाठीं जलदीनें चालून सुद्धां शेवटीं ती हातांतून गेलीच. वान्याने छत्री उलटी होण्याच्या बेतांत होती, पायाजवळच्या सोग्यांनी तिच्या पोटऱ्यांना मिठी मारली. डांबरी रस्त्यावरून खळखळ पाणी वहात होतें. तिच्या चपलांचा चपचप असा आवाज होत होता. एका हातांत पुस्तकें, दुसऱ्या हातानें उलटी होणारी छत्री आवरण्याचा प्रयत्न, दांतानें वाऱ्यावर उडणारा पदर धरलेला; अशा गडबडींत तिची छत्रीही उलटी झाली. डोक्यावर पाऊस धो धो कोसळत होता. पुस्तकें भिजत होती आणि आतां तर पातळही शरीराला सोडीना! इतकी त्रेधा झाली तरी ती ट्रॅमसाठी मागल्या स्टँडकडे चाललीच होती. तोंच हातांतलें एक पुस्तक रस्त्यावर पडलें तें वांकून तिनें जेमतेम वर उचललें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .