ध्रुव बाळाच्या कथेचा मतितार्थ — माधवी गोखले

  ध्रुवाचा पिता, उत्तानपाद राजा आपल्या सर्वामध्ये दडलेला आहे. आपल्या मनात नेहमी नीती आणि रुची वास करून असतात. बहुतांश वेळी रुची नीतीवर मात करते. अढळपदासाठी ध्रुवबाळ एका पायावर उभा राहिला म्हणजेच त्याने आपल्या रुचीला लगाम घालून नीतिमत्ता जागरूक ठेवली. तेव्हा त्याला अढळपद मिळाले. आपणही रुचीला मुरड घालत सुनीतीच्या मार्गावर चालायला हवं..
महाविद्यालयामध्ये असताना एकदा आम्ही स्टडी टूरला गेलो होतो. शिक्षक आणि आम्ही गप्पा मारत असताना अचानक आमचे सर म्हणाले, ‘मी तुम्हाला ध्रुवबाळाची गोष्ट सांगतो.’ आम्ही महाविद्यालयातले विद्यार्थी होतो, त्यामुळे ही कसली गोष्ट ऐकायची असे वाटले. आम्ही सरांना सांगितले ही गोष्ट लहानपणी खूप वेळा ऐकली आहे. यात काय ऐकायचे? आमची स्पष्ट नाराजी त्यांच्यापर्यंत पोहचवली. पण तरीही त्यांनी आम्हाला गोष्ट सांगितली.

आपल्याला माहीत असलेली ध्रुवबाळाची गोष्ट म्हणजे : उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या. सुनीती आणि सुरुची. सुरुची राजाची लाडकी राणी होती आणि सुनीती नावडती राणी होती. ती धर्मराजाची मुलगी होती. सुरुचीच्या मुलाचे नाव होते उत्तम तर सुनीतीच्या मुलाचे नाव होते ध्रुव. एकदा राजाच्या मांडीवर ही दोन्ही मुले बसली होती. सुरुचीने हे पाहिले आणि तिला खूप राग आला. तिने खसकन ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरून उतरवले. ती ध्रुवबाळाला म्हणाली, तुला मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. ध्रुवबाळ खूप दुखावला गेला. त्याने मनाशी निश्चय केला की आपण अशी जागा मिळवायची की जिथून आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने तपश्चर्या करायचे ठरवले. लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तो लहान असल्याचे सांगितले. पण त्याचा निर्धार कायम होता. तो जंगलात गेला. एका पायावर उभा राहिला. त्याने तपश्चर्या करायला सुरुवात केली. कधी जोराचा पाऊस-वादळ, कधी खूप थंडी तर कधी खूप ऊन, वणवे, जंगली श्वापदे यांचा सामना करावा लागला. पण ध्रुवबाळाचा निश्चय ढळला नाही. तो एका पायावर उभा राहून तपश्चर्या करत राहिला. विष्णू त्याला प्रसन्न झाला आणि त्याला उत्तरेकडे अढळ स्थान मिळाले. आपल्याला सगळ्या ग्रह ताऱ्यांचे स्थान बदलताना दिसते, पण ध्रुव ताऱ्याचे स्थान मात्र कधीच बदलत नाही. त्याचे स्थान अढळ आहे.

आता गोष्टीचा वास्तव अर्थ बघू या.

उत्तानपाद हा शब्द उत्तान आणि पाद या दोन शब्दांपासून बनला आहे. उत्तान म्हणजे अस्थिर आणि पाद म्हणजे पाय. ज्याचे पाय स्थिर नाहीत असा उत्तानपाद राजा. पाय स्थिर नाही याचाच अर्थ त्याचे मन स्थिर नाही.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply