मराठी भाषेचे अर्थकारण


महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईनगरीत टॅक्सी व रिक्षेत बसताना हिंदी बोलावे लागणाऱ्या, घाऊक खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना गुजराती बोलणाऱ्या, औद्योगिक कामकाजात इंग्रजीचा व्यापार कराव्या लागणाऱ्या मराठी भाषिकाला त्यामागील अर्थकारणाचे रहस्य जाणून घ्यावे लागेल. ताजमहाल हॉटेलच्या ‘रांदेव्हू’ उपाहारगृहात जाऊन मराठी माणूस जेव्हा मराठी भाषेत व्यवहार करेल व तेथील मेन्यूकार्डावर पदार्थांची यादी जेव्हा फ्रेंचच्या बरोबरीने मराठीत (इंग्रजीत नव्हे) छापलेली असेल तेव्हा मराठी भाषा ‘जगायला’ सुरुवात होईल. मुंबई दूरदर्शनवरील सर्व भाषांतील सिनेमांच्या तळ-टीपा (sub-titles) मराठी भाषेत असतील तेव्हा मराठी टिकायला सुरुवात होईल. मुंबई शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी भाषिक वर्तमानपत्रांची, नियतकालिकांची व पुस्तकांची संख्या जेव्हा इतर भाषिक प्रकाशनांपेक्षा जास्त असेल तेव्हा मुंबई दूरदर्शनवरील इतर भाषिक पगडा दूर होईल. => लेखक -: निशिगंध देशपांडे ;  वर्ष १९९३ ४ वर्षापुर्वी मुंबईत झालेल्या प्रथम जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून कवी कुसुमाग्रजांनी वर्णिलेली मराठी भाषेची परिस्थिती ‘‘----डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे----’’ आज सुधारली आहे का याचे परीक्षण करू गेल्यास आज काय दृश्य दिसते? भारतात व भारताबाहेर सभा, परिषदा झाल्या, अनेक सरकारी व निमसरकारी समित्या मराठी भाषेचे रक्षण, पोषण, संवर्धन करायला निर्माण झाल्या. साहित्य संमेलनादि सोहळ्यांमधून दु:खदर्शक, प्रसंगी आवेशपूर्ण  ठराव झाले. सरकारी अधिकार्‍यांनी फतवे काढून तुम्हा आम्हाला मराठी भाषिक होण्याचे आवाहन केले, सक्ती करण्याच्या अधू

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , अर्थकारण , भाषा

प्रतिक्रिया

  1. jasipra

      5 वर्षांपूर्वी

    हिंदी सोडून अन्य भाषांची हीच थिती होत आहे

  2. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    आपण पुनश्च च्या सर्व सभासदांनी जरी आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा आग्रह धरला तरीही मोठा फरक पडेल. रिक्षावाले, भाजीवाले, इस्त्रीवाले सगळ्यांशी मराठीत बोलायला सुरुवात करा. मी तर फाईव स्टार हॉटेल मध्ये जाऊन पण मराठीत सुरुवात करतो. माझा अनुभव आहे की तिथे काम करणारे बरेचदा मराठी असतात किंवा त्यांना मराठी येत असतं.

  3. Prchbhopi8

      7 वर्षांपूर्वी

    हो आजकाल माणूस हा महाराष्ट्रात राहतोय खरा पण आजकाल तो महाराष्ट्रात राहून मराठीच कमी बोलतोय ,मुंबईत राहून तो हिंदी बोलतोय ....जर एखादा मराठी माणूस जेंव्हा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या एखाद्या भागात जातो तेंव्हा ते लोक त्यांची भाषा सोडून बोलतात का आपल्या सोबत मराठी ,नक्कीच ह्याच उत्तर नाहीच असेल ....मग आपण देखील मुंबईत राहून हिंदी आणि इंग्लिश भाषा का बोलतोय ...त्यांना देखील मराठी भाषा बोलायचं प्रयत्न करुदेत ...जसा आपण करतो हिंदी आणि दुसऱ्या भाषा बोलायचा..महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी हि आलीच पाहिजे आणि ती त्याने अभिमानाने बोलली पाहिजे ..जर आपण बोलायला काचकूच करत असू तर दुसऱ्या कडून काय अपेक्षा ठेवायची .. भले आपण शहरात राहत असू पण आपली संस्कृती ,भाषा ह्याचा विसर पडत कामा नये ...

  4. varshagokhale

      7 वर्षांपूर्वी

    मराठी माणसांना मराठी वाचावी किंवा बहरावी असे कुठे वाटते? उलट इंग्रजी येत नाही याचे वैषम्य आहे! खेड्यातून उघडणार्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा काय दर्शवतात? फी भरूनही सामान्य माणूस आपल्या मुलांना तेथे दाखल करून धन्य होतोय!

  5. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    याच संदर्भात अजून एक लेख येत्या काही दिवसात प्रसिद्ध होईल. त्यावरील प्रतिक्रियांवरून आपण काही ठोस निर्णयाला येऊ शकतो.

  6. Shyam

      7 वर्षांपूर्वी

    महेश एलकुंचवार यांनी म्हटले आहे की शहरी लोक मराठी टिकवणार नाहीत . अजून तरी खेड्यातील लोकाना मराठी बोलायची लाज वाटत नाही . तोपर्यंत मराठी टिकेल .

  7. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    बदल हवा आहेच , तो उपकारक रीतीने घडून यावा यासाठी कोण जबाबदार आहे?आपण एखादी आधार रचना बनवू शकतो का या संदर्भात?अर्थशास्त्राची तत्वे मराठी माणसा च्या गळी उतरलेली आहेत का? या संदर्भात सद्यस्तिथी काय आहे?

  8. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    विचार प्रवर्तक! मराठी लोकांना वाटणारे इंग्रजी प्रेम कमी करण्यासाठी मराठी माध्यमाचा चांगला अनुभव मराठी लोकांना आला पाहिजे व तो टिकून राहण्यासाठी व्यवस्था ही असायला हवी. अशा काही उपायांची चर्चा करता येऊ शकेल का एखाद्या लेखात. सर्वसामान्य माणूस म्हणून मला माझ्या पातळी वरून सुरवात करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन होऊ शकेल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen