लेखिका: सौ. कमलाबाई बंबेवाले ********** “आजची पार्टी खरोखरीच अगदी फर्स्ट क्लास होती अं! फारच सुरेख व्यवस्था होती बुवा सारी!” सुस्वागतमच्या भव्य कमानीजवळ शोफरने आणलेल्या आपल्या मोटारीत चढून ती चालू होताच सुशीला वसंतरावांना म्हणाली, “काहीसुद्धा कुठे कमीपणा दिसून आला नाही आज, नाही?” “दिसेल कसा कमीपणा? कित्येक वर्षांनी गव्हर्नर आज तेथे आलेले, आणि पार्टीही दिलेली मोठमोठ्या श्रीमंत मालगुजारांनी मिळून. ते कशाला कोठे कमतरता करतील? पैसा खर्चणारे मालगुजार आणि एकंदर व्यवस्था पहाणारी मिसेस् हार्लों सारखी तज्ञ बाई-मग पार्टी अगदी फर्स्ट क्लास होणार यांत नवल ते काय?” “खरोखरीच मिसेस् हार्लो या असल्या कामांत अगदी तज्ञ आहे बाई! मोठमोठाल्या पार्ट्या किंवा खाने यांची व्यवस्था करावी ती मिसेस् हार्लोनेच! आणि येवढ्या मोठ्या डिस्ट्रिक्ट इंजिनियरची बायको पण कोणीही विनंती केली की अगदी मनापासून मदत करते सर्वांना!” “हा तिचा मोठपणा आहे खरा! कारण नाहीतर नुसत्या पैशांनी या लोकांना काय करतां आलं असतं? खाण्यापिण्याच्या इंग्लिश पदार्थांचा यांना गंधसुद्धा नाही; तो त्यांतले उत्तमोत्तम पदार्थ निवडून काढून पार्टीबीर्टीची कशी व्यवस्था करू शकणार? आणि अशा कामी मदत करू शकतील अशा फारशा हिंदी बायकाही अजून तितक्या तयार झालेल्या नाहीत!” “येवढा पुढाकार घेऊन हिंदी बायका कसल्या तयार होताहेत लोकांना मदत करायला? उंची उंची साड्या नेसून त्यांचे प्रदर्शन करण्यांतच सध्यांतरी पुष्कळांचे कौशल्य खर्च होते आहे! आज पाहिलं नाहीत कशा एकेकजणी नटल्या होत्या ते? ती मिसेस् राव अन् ती मिसेस् खान-एकेकीच्या साड्या म्हणजे झळकत होत्या नुसत्या अगदी! अन् आजकाल मिसेस् फाटकसुद्धां त्यांच् अनुकरण करू लागली आहे बरं का! पाह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ashutoshk
7 वर्षांपूर्वीछान आहे लेख
bhidelata
7 वर्षांपूर्वीvery nice idea ! enjoyed reading this. times have changed but the basic concepts in social and family relations have remained same even today. Grass is always greener on other side of fence even today.
sakul
7 वर्षांपूर्वीनर्मविनोद कसा असावा, याचं हे उत्तम उदाहरण आहे. मध्यंतरापर्यंत आल्यावर वाटत होतं की, कथा गंभीर होणार आणि उभयतांमधील ताणतणाव वाढणाार. पण उत्तरार्धात मजेशीर वळण दिलं कथेला लेखिकेनं. मजा आली.
Mrg
7 वर्षांपूर्वीअगदीच बाळबोध. अंगापेक्षा बोंगाच मोठा वाटतोय.
asmitaph
7 वर्षांपूर्वीnice story. written in which year ?
SMIRA
7 वर्षांपूर्वीमस्त सुंदर कथा
shailesh71
7 वर्षांपूर्वीमस्तचं! नर्मविनोदी.!
rajashreejoshi
7 वर्षांपूर्वीखुसखुशीत कथा
sansal24
7 वर्षांपूर्वीलेख वाचत असताना टीव्ही वर दृश्य चलचित्र बघतोय असच वाटावं इतका सुंदर लेख
arush
7 वर्षांपूर्वीMastach
bookworm
7 वर्षांपूर्वीजुन्या वळणाची कथा! किस्त्रीम, हंस, मानिनी अशा मासिकांमध्ये शोभणारी....! मजा आली! अशा युक्त्यांनी नवरा बायकोच्या नात्यातले ताण व तोच तोचपणा दूर करू शकतो आपण! वाः!
manasi
7 वर्षांपूर्वीमस्तच होती ही कथा
jspalnitkar
7 वर्षांपूर्वीव्वा!! फारच छान...आकाशवाणी वर नाटिका/श्रुतिका (हा शब्दच फार लोभस आहे!) असतात तशी वाटली ही कथा... ह्यातल्या मराठी ची style पण छान आहे...साधारण कुठल्या वर्षी लिहिली आहे ही कथा?
9322496973
7 वर्षांपूर्वीमंगला ओगले छोटीशी छान आणि मजेदार कथा आवडली
9322496973
7 वर्षांपूर्वीछान आणि मजेदार कथा. आवडली
shubhadabodas
7 वर्षांपूर्वीछान कथा! फडके, खांडेकर ह्यांच्याही आधी अशी लेखनशैली असायची.
sureshjohari
7 वर्षांपूर्वीखूप छान कथा .या साठीचा फोटो खूपच छान आणि अनुरूप
vilasrose
7 वर्षांपूर्वीनर्मविनोदी सुंदर लेख!दुसर्याच्या बायकांची फक्त स्तुती करणार्या नवर्यांना धडा शिकवणारी गोष्ट! लेखासाठी दिलीपकुमार,नर्गिस आणि एक नटीचा फोटो एकदम शोभून दिसतो.
manjiriv
7 वर्षांपूर्वीसुशीला हुश्शारे नै.....हलकी फुलकी कथा. पाताळयंत्री, लबाड, गडे, चिरडीला येणे हे शब्द बऱ्याच दिवसांनी वाचले. कथेतलं शेवटचं वाक्य हल्लीच्या काळात सात्विकपणाची कमाल आहे. :)
shubhada.bapat
7 वर्षांपूर्वीमजा आली. एखाददा स्वयंपाकाबाबत अस करायला पाहीजे.
Meenalogale
7 वर्षांपूर्वीखूप छान नर्मविनोदी कथा.