मंचीय कविताः एक वेगळा साहित्यप्रकार


अंक- अंतर्नाद; वर्ष- जानेवारी २००७  लेखाबद्दल थोडेसे :  कविसंमेलने हा जेवढा साहित्यविषयक  गंभीर उपक्रम आहे तेवढाच तो मनोरंजनाचा खजिनाही आहे. संमेलनाच्या नाना तऱ्हा आणि कवींच्या नाना कळा  तर असतातच, श्रोते आणि सूत्रसंचालकही आपापल्या परीनं त्यात भर घालत असतात. मंचीय म्हणजे सादरीकरण करण्यायोग्य कविता कोणती या प्रश्नाचं  प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. कविसंमेलनातील अशा वृत्ती-प्रवृत्ती टिपणारा हा मनोरंजक, नर्मविनोदी लेख- ऊर्मिला चाकूरकर या पेशाने डॉक्टर. त्या मराठवाड्यात असतात. पेशंटची नस सापडता सापडता त्यांना विनोदाचीही नस सापडली. मानवी स्वभावातील विसंगतीतून निर्माण होणारा विनोद त्या नेमका शब्दांत पकडतात. एकेकाळी लोकसत्ताने हास्यरंग नावाची विनोदाला वाहिलेली पुरवणी दिली होती. त्यातून जे काही चांगले विनोद लेखक पुढे आले त्यात उर्मिला चाकूरकर हे एक प्रमुख नाव आहे. ********** ‘आणि मी ऐनवेळी कविता बदलतो आहे’ – या वाक्याने संमेलनात कविता सादर करायला सुरुवात केलेले अनेक कवी मी पाहिलेले-ऐकलेले आहेत. कविसंमेलनात सादर करण्याची कविता आधी निवड करून ठेवलेली असते. साधारणपणे  कुठे कवितावाचन करायचे आहे, तिथला श्रोतृसमुदाय कशा प्रकारचा असेल याचा अंदाज करून कविता निवडलेली असते. उपस्थित श्रोतृसमुदाय कसा आहे याचा अंदाज यायला काही मिनिटेच पुरेशी ठरतात. सुरुवातीच्या कवीने सादर केलेल्या कवितेला टाळ्या मिळतात, की शिट्ट्या यावरून लगेच श्रोत्यांचा ‘मूड’ लक्षात येतो. श्रोत्यांचा ‘मूड’ बनवण्यात अजून एक महत्त्वाचा घटक संप्रेरकाचे काम करतो. तो म्हणजे सूत्रसंचालक. सुरुवातीच्या निवेदनातच त्याने श्रोत्यांची पकड घेणे अपेक्षित असते, ना ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , विनोद , कविता रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. sureshjohari

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख.. छान मांडणी . आवडला . धन्यवाद

  2. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    छान लेख. धन्यवाद.

  3. sakul

      7 वर्षांपूर्वी

    'उदंड झाली कविता गवताऐशी' असे (किंवा यासम काही) समर्थ रामदास यांनी त्या काळीच लिहून ठेवले आहे. आता कविसंमेलनेही उदंड झाली आहेत. या मंचीय कवितेबद्दलचा हा लेख सुंदर. तार लागलेल्या एका मैफलीचा लेख उल्लेखात आहे. त्यात कोण अध्यक्ष आणि कोण सूत्रसंचालक असेल, याचा अंदाज मला सहज बांधता येतो. कवितांचे खरे तर वेगवेगळे प्रकार आहेत. एकांतात स्वतःशीच मोठ्याने म्हणायची किंवा मनातच वाचायची कविता वेगळी, गाणे होऊन येणारी कविता वेगळी आणि मंचीय कविता वेगळी. दूरचित्रवाणी वाहिन्या वाढल्यावर हिंदी हास्यकविसंमेलने पाहायला मिळाल्यावर आपल्याकडेही कविसंमेलनात विनोदी कवितांचीच अपेक्षा धरली जाऊ लागली. पण म्हणून काही तिथून कविसंमेलनांची सुरुवात झालेली नाही. विंदा-बापट-पाडगावकर यांच्या जाहीर कविता आणि शंकर पाटील-धाकले माडगूळकर-दमामि यांचं जाहीर कथाकथन हे साधारण तीन दशकांपूर्वीचे महाराष्ट्राचे आवडते कार्यक्रम होते. वर उल्लेख केलेल्या कवी त्रिकुटाबद्दल एका संमेलनात (परभणीच्या?) ना. धों. महानोर यांनी सनसनाटी विधान करून लक्ष वेधले होते. (त्याच महानोर यांनी मग पुण्याच्या संमेलनात विंदा किती थोर, मला त्यांचा किती लळा होता, हे भावगीत गायिले होते!) साहित्य संमेलनात किंवा कार्यक्रम म्हणून सादर होणाऱ्या कविसंमेलनात त्याच त्या कविता (हमखास हशा, टाळ्या मिळविणाऱ्या किंवा भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवणाऱ्या) सादर होतात, हे लेखिकेचे म्हणणे खरे आहे. तो खरा रसिकांचा दोष. गाण्याच्या कार्यक्रमात श्रोत्यांना जुनीच गाणी ऐकायची असतात, तसे हे. जामखेडच्या कविसंमेलनात दर वर्षी सादर होणाऱ्या त्याच त्या कविता ऐकून कंटाळल्याने मी एकदा 'ती वेळ निराळी होती, परि कविता पुराणीच होती' असं लिहिलं होतं. त्याचा काही परिणाम झाला का, हे ऐकायला मी काही पुढच्या संमेलनात गेलो नव्हतो. असो! एकूणच कविता हे बरंच काही लिहिण्यासारखं प्रकरण आहे.

  4. bhidelata

      7 वर्षांपूर्वी

    लेख फारच छान. अलिकडे दादर शिवाजी पार्क मध्ये शिरीष पै काव्य कट्टयामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी नविन कविंना उत्तेजन म्हणून काव्यवाचन असते. तिथे हे सर्व अनुभवता आले. हा लेख वाचताना ते सर्व डोळ्यासमोर उभे राहिले .

  5. manisha.kale

      7 वर्षांपूर्वी

    मंचीय कार्यक्रम कसा असावा हे फार समर्पकपणे सांगितले आहे लेखात. मुद्देसूद मांडणी वाटली. लेख आवडला, फार chan.

  6. gondyaaalare

      7 वर्षांपूर्वी

    सगळेच हास्यकवि ह्या सदरात मोडणारे असतील तर पोरकटपणाला आवर घालायचं कसब सूत्रसंचालकाला अवगत असायला हवे . मंचीय कवितेचं चित्र छान उभं केलं आहे

  7. arya

      7 वर्षांपूर्वी

    छान .नर्म विनोदगर्भ शैली आवडली



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen