आणीबाणी

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतरच्या मोकळ्या हवेत देश, समाज घडवण्याचे, प्रत्येक क्षेत्राला आकार देण्याचे प्रयत्न जोमात सुरु झाले. आता आपल्या स्वातंत्र्यावर कोणीच घाला घालू शकणार नाही असा विश्वास स्वातंत्र्यानंतरच्या २८ वर्षात सरकारनं निर्माण केला होता. परंतु अचानक २५ जून १९७५ रोजी या स्वातंत्र्याचा संकोच झाला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली.

२१ महिने देशाने हा वादळी कालखंड अनुभवला. दुसरा स्वातंत्र्य लढा, लोकशाहीचा खून, अनुशासन पर्व, स्वातंत्र्यावर घाला अशा विविध शब्दांनी या पर्वाचा उल्लेख होतो. भारतीय राजकारण,समाजकारण आणि भारतीयांच्या सामाजिक धारणा यांच्यात बदल टोकाचे बदल होण्याची प्रकिया याच काळात सुरु झाली. त्याचे प्रतिबिंब अमिताभच्या अँग्री यंग मॅनच्या उदयापासून तर विविध सामाजिक-सांस्कृतिक चळवळी थंडावण्यापर्यंतच्या अनेक बाबींमधून पुढील काळात उमटले.

आणीबाणीच्या या सर्वांगीण परिणामाचा, कारणांचा, त्याला झालेल्या विरोधाचा वेध या विशेषांकात घेत आहोत आणि त्या कालखंडात पुनश्र्च एक वैचारिक फेरफटका मारत आहोत. 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

आणीबाणी

Install on your iPad : tap and then add to homescreen