पुन्हा एकदा अत्रे, पु. ल., कुसुमाग्रज …

आचार्य अत्रे, पु ल देशपांडे व कुसुमाग्रज म्हणजे गेल्या ६० वर्षाहूनही अधिक काळ मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे तीन जबरदस्त प्रतिभावंत. महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक इतिहासाला ज्यांच्याशिवाय पूर्णताच येणार नाही असे तीन थोर सरस्वतीपुत्र. ज्यांच्या साहित्याची मोहिनी, ज्यांचे गारुड आजही मराठी मनावर कायम आहे आणि कितीही वाचले तरीही ज्यांच्या साहित्याची गोडी कायमच अवीट राहिली आहे, असे हे थोर कलोपासक, रसिकाग्रणी. या तिघांपैकी आज कोणीही हयात नाही. मात्र अर्धशतकाहूनही अधिक काळ त्यांच्या साहित्याची मोहिनी महाराष्ट्रमनावर कायम आहे.या तिघांबद्दल परचुरे प्रकाशन मंदिराने नुकतीच तीन छान पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘अप्रकाशित आचार्य अत्रे’, ‘पुन्हा मी, पुन्हा मी’ व ‘सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज’ ही ती तीन पुस्तके. यापैकी अप्रकाशित आचार्य अत्रे  हा अत्रेंच्या आजवर अप्रकाशित राहिलेल्या साहित्याचा संग्रह आहे. तसेच पुन्हामी, पुन्हा मी हा पुलंच्या अप्रकाशित साहित्याचा संग्रह आहे तर सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज हा विविध मान्यवर साहित्यिक व समीक्षकानी कुसुमाग्रजांच्या हयातीत तसेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. amarsukruta

    किरण भिडेजी
    लगेचच अशा लेखानंतर एक लिंक द्यायची की ज्यांना ही तिनही पुस्तके घ्यायची आहेत ती घेऊ शकतील. कदाचित बहुविध ने मार्केटिंग केल्याने वाचकांना थोडया सवलतीतही मिळू शकतील…

  2. raghuvir@swsfspl.com

    लेख वाचल्यानंतर पुस्तके घेण्याची इच्छा निर्माण झाली

Leave a Reply