प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    पुस्तक डाउनलोड केले. वाचले. १४३ पाने आहेत. (पान क्रमांक ८ व ९ नजरचुकीने दोनवेळा scan झाले आहे) पुस्तक अप्रतिम आहे. शा.श. रेगे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचे दोन भाग आहेत. एक ग्रंथालयासंबंधी आणि दुसरा वाचनासंबंधी. वरील लेखात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त या पुस्तकात :- पुस्तक वाचावे कसे? याचे उत्तम वर्णन आहे. काही वेळा नर्म विनोदी शैलीतील वाक्ये वाचताना गंमत वाटली. उदा. (पुस्तकात खूण ठेवताना) ...... “मी आपला पानाचे कोपरेच मोडणे जास्त पसंत करत असे. पानाचा कोपरा मोडताना, त्या पुस्तकाच्या विद्वान लेखकाचा मी जणू कानच पिरगळीत आहे असा मला आनंद व्हायचा”.... पुस्तक उघडायचे कसे? ग्रंथालयात पुस्तकांची मांडणी कशी करतात? याविषयी माहिती दिली आहे. वाचकांच्या दोन तऱ्हा देखील मांडल्या आहेत. त्यावेळी देखील वाचायला वेळ मिळत नाही असं म्हणणारे लोकं होते. त्यावर लेखकाने, मिनिटाला दोनशे शब्द या गतीने वाचले तर किती वाचन होईल याचा हिशेब मांडला आहे. ( मी मिनिटाला आठशे शब्द, या गतीने वाचतो !!!) “मराठी पुस्तके संपत नाहीत, विकली जात नाहीत” असे ढमढेरे या प्रकाशकांचे वाक्य या पुस्तकात आहे. म्हणजे ही तक्रार आजची नाही. १९६७ साली देखील हीच परिस्थिती होती. !!!! आज तर ई बुक हा प्रकार लोकप्रिय होत आहे. ई बुक हे किंमतीच्या दृष्टीने स्वस्त असले तरी डोळ्याला आणि वाचायला त्रासदायक आहे हे खरेच. पण मला हवी असलेली दोन जुनी पुस्तके केवळ ई बुक स्वरूपात उपलब्ध होती. त्यामुळे वाचायला तरी मिळाली. भानू शिरधनकरांच्या या दुर्मिळ पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल आणि विशेष म्हणजे PDF स्वरूपातील पुस्तकाची link दिल्याबद्दल बहुविधचे मन:पूर्वक आभार.

  2. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    नवीन चांगली माहिती देणारा लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen