fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

देवळातले तीन दिवस

कथासंग्रह- गंगार्पण

लेखक – राजेन्द्र बनहट्टी

सपाट, सोप्या, सखल उतारावर हातपाय ताणून गाव लांबट पसरले होते. गावाच्या माथ्यावर टेकडीचे टेंगूळ उमटले होते. त्या टेंगळावर देवळाची पिवळी पुटकुळी उगवली होती. मातीच्या पायऱ्या ओबडधोबड चढत गावातून टेकडीवर गेल्या होत्या. एकमेकींच्या पायांत पाय अडकवत त्या पायऱ्या नागमोडी नाचत वर गेल्या होत्या. अखेरीला देवळाच्या दारासमोर एकमेकींत मिसळून त्या घसरून पडल्या होत्या आणि त्यांचे छोटेसे सपाट आवार झाले होते.

मातीने सारवलेल्या त्या आवारात उभे राहिले की खाली गावाची रंगीबेरंगी गोधडी अंथरलेली दिसत होती. गावाच्या पलीकडे दूरवरच्या अस्फुट डोंगरकडांवर आकाशाच्या छताची चमकती किनार टेकलेली होती. टेकडीच्या डावीकडे झाडांच्या विरळ रांगेतून एक कृश नदी पुसट वळसे घेत गेली होती. नदीच्या पाण्याच्या तुकड्यांच्या फुटकळ काचा दृष्टी पडताच मधूनच लकाकून उठत होत्या टेकडीच्या उजवीकडे उकरलेल्या शेतांच्या काळ्याशार पाटीवर रस्त्याची पांढरी रेघोटी वाकडीतिकडी उमटलेली होती. रस्त्यापलीकडे धुळीने माखलेले भुरकट रान शेवटपर्यंत माजले होते. त्यावर पाखरांचे कळप मधूनच उसळ्या मारत होते. देवळाच्या मागे सोनचाफ्याचे पांढुरके झाड कलते उभे होते. त्या झाडापासून उतरणारी राठ करडी जमीन, उदास खुरटी झुडपे, वाळके विकल ओढे, बसके उजाड उंचवटे यांवरून ओबडधोबड लोळत जाऊन दृष्टिपथाबाहेर कुठे तरी कोसळली होती. जमिनीचा शेवट आणि आभाळ यांत मोठे भगदाड पडलेले दिसत होते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu