fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

क्षत्रींचे एक प्रवासवर्णन

नव्याने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांपेक्षा मला आता जुनी झालेली, पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली पुस्तके गुंगवून टाकतात. ही नवी पुस्तके चुरचुरीत असतात ती मजकुराच्या शैलीदारपणामुळे; पण उत्तम वाङ्मयीन लेणे म्हणून ती नवी असूनही जन्माला येतायेताच कोमेजतात – माना टाकतात – शिळीबाशी होतात. जुन्या पुस्तकांमधला मजकूर शैलीदार नसेल – ओबडधोबडच असेल; पण वाङ्मय म्हणून ही जुनी पुस्तके अगदी ताजी, ‘फ्रेश’ वाटतात.

नुकतेच माझ्या वाचनात असे एक पुस्तक आले. त्या पुस्तकाने मला विलक्षण आनंद दिला. भरभरून! पुस्तक अगदी छोटे होते. पासष्ट-सत्तर पानांचे. १८६३ साली ते प्रसिद्ध झालेले होते. त्याचे कागद तांबूस पिवळसर झालेले होते. आणि उडदाचा पापड जसा मोडतो, तशी त्याची पाने जरा जोरात उलटली गेली की त्यांचे तुकडे पडत होते. फूल काय सांभाळाल अशा नाजुकपणाने व हलकेपणाने ते हाताळावे लागत होते.

या छोट्या पुस्तकाचं नाव मात्र लांबलचक होते. ‘गोकर्णमहाबळेश्र्वरचे यात्रेप्रकरणी वृत्तांत’ ! आणि त्याचे लेखक होते ‘जगन्नाथ विठोबा क्षत्री’.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
Close Menu