fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

लोकशाहीकडून प्रजाप्रभुत्वाकडे

पुस्तकाचे नाव- विठोबाची आंगी

लेखक- विनय हर्डीकर

प्रकाशक- देशमुख आणि कं.

चिकमगळूर…

चिकमगळूर मतदारसंघ इंदिरा गांधींच्यासाठी मोकळा करण्यात आला आणि परत एकदा एक फार महत्त्वाचा राष्ट्रीय प्रसंग निर्माण झाला. प्रत्यक्ष निवडणूकीचा  निकाल आधीच लागल्यासारखा होता आणि जनता नेत्यांनीही बाई निवडून आल्या तरी काही फारसं बिघडत नाही अशा तऱ्हेची भूमिका घेतली होती. तरीही ही निवडणूक अटीतटीनं लढली गेली. कारण दक्षिणेकडच्या एका महत्त्वाच्या राज्यात जनता पक्षाला शिरकाव करून घेण्याची तीच संधी होती. १९७७ च्या ऑक्टोबरमध्ये इंदिरा गांधींच्या अटकेचा सावळागोंधळ झाला आणि बेलछी भेटीपासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय पुनर्प्रवेशाला नवी गती मिळाली. जानेवारीत त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला, फेब्रुवारीत कर्नाटक, आंध्रमध्ये संपूर्ण तर महाराष्ट्रात एक चतुर्थांश बहुमत मिळवलं. त्यांच्या वेगामुळे आणि बेमुर्वत वृत्तीमुळेच आणीबाणी आणि त्या काळात झालेले अतिरेक हे विषय मागे पडले. जनता पक्ष विरोधी मत लवकर संघटित झालं आणि जनता पक्षावरचे हल्ले अधिक धारदार बनले. या साऱ्या घटनांचा परिपाक म्हणजे त्यांच्यासाठी चिकमृगळूरसारखा निर्वेध मतदार संघ मोकळा करून देऊन आणीबाणीच्या अतिरेकांबद्दलचे खटले उभे राहण्याआधीच त्यांना राजकीय जीवनात पुन्हा सन्मानाने आणण्याची कल्पना. शिवाय इंदिरा गांधी आणि जॉर्ज फर्नांडिस, वीरेंद्र पाटील आणि देवराज अरस या केंद्रीय व राज्य पातळीवरच्या नेत्यांमधल्या संघर्षाचं एक नवं अंग या लढतीला होतंच. केंद्रीय नेते राज्य स्तरावर आपला प्रभाव पाडणार होते, तर इंदिरा गांधींना लोकसभेत नेऊन देवराज अरस किंवा त्यांच्याशी अटीतटीची लढत देऊन वीरेंद्र पाटील हे एकदम राष्ट्रीय मंचावर प्रकाशझोतात येऊ पाहात होते. एकूणच ७७ च्या निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर अवघ्या दीड वर्षात परत लोकसभेत येण्याचा इंदिरा गांधींचा बेत खूप साहसी होता व सर्व जगभर या घटनेला अवास्तव महत्त्वही आलेलं होतं. चिकमगळूर पोटनिवडणुकीमध्ये मार्च ७७ नंतरचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार होता म्हणून साक्षीभावानं मी ती निवडणूक जवळून पाहाण्यासाठी गेलो.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu