अंक : जडण-घडण, मे २०२१
सापेक्षतावादाचा सिद्धान्त प्रतिपादन करून एक शतक उलटून गेलं असलं तरी या सिद्धान्ताबाबतची चर्चा आणि कुतूहल कमी झालेलं नाही. त्यातील अनाकलनीयता आणि रहस्य सामान्य माणसाला आकर्षित करतं. या सिद्धान्ताची पुन्हा चर्चा होण्याचं कारण म्हणजे या सिद्धान्ताची पडताळणी पाहण्यासाठी खग्रास सूर्यग्रहणाच्या निरीक्षणाला पूर्ण झालेली शंभर वर्षे. १९१९ साली एडिंग्टन यांनी धाडसी मोहीम आखून ही निरीक्षणं नोंदवली होती. हा प्रवास जसा अद्भूत आहे, तितकीच अद्भूतता या गोष्टीच्या चरित्र नायकाच्या जीवनात भरलेली आहे. या चरित्रनायकाचं नाव आहे अल्बर्ट आईनस्टाईन. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा शाळेत फारसा चमकला नाही. खरंतर त्याची गणना अभ्यासात फारशी गती नसलेल्या मुलांमध्ये होत होती. गृहपाठ कधीच पूर्ण नसे. त्यामुळे त्याला शाळेत शिक्षा म्हणून उशिरापर्यंत थांबावे लागे. शिक्षकांची बोलणी खावी लागत ती वेगळीच. मात्र त्याची चौकस बुद्धी जागृत असे. अनेक प्रश्न त्याला पडत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न तो करी. शाळेतली प्रगती समाधानकारक नसली तरी त्यांचं गणित विषयक आकलन उच्च दर्जाचं होतं. त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि वरच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अल्बर्ट सोडवत असलेली गणितं समजत नसत. भौतिकशास्त्रातील प्रयोगही तो स्वतंत्ररित्या करे, त्याचं अवांतर वाचनही अफाट होतं. माध्यमिक शाळेतच त्यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा अभ्यास केला होता. त्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे शाळेने त्याला बेशिस्त ठरवून काढून टाकलं. त्याचं गणितातले ज्ञान उच्च दर्जाचं आहे असं प्रमाणपत्र मिळूनही शाळेने काढून टाकल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्याचा अभ्यासक्रम पुरा होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेता येत नव्हता. पुढील वाटचालीसाठी त्यांनी शिक्षकांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला. तिथेही निराशाच पदरात पडली. तुला काही येत नाही. त्यामुळे तू काही केलं तरी काय फरक पडणार? अशा उत्तराने त्याची बोळवण करण्यात आली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
जडण-घडण
, मे २०२१
, विज्ञान आणि तंत्रज्ञान
विज्ञान -तंत्रज्ञान
Manoj Deshmukh
4 वर्षांपूर्वीउत्तम लेख
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीअशी माहिती वाचल्यावर नवीन काहीतरी शिकायला मिळाल्याचा आनंद वाटतो . शास्त्रीय पुस्तकांपेक्षा अशी लेखातून मिळालेली माहिती वाचनीय वाटते .
Amol Patil
4 वर्षांपूर्वीखुपच अभ्यासपूर्ण माहिती... वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल... बहुविध वरील लेख खुपखुप वाचनीय असतात... धन्यवाद बहुविध...
Ravindra Godase
4 वर्षांपूर्वीvery precious information'