गणितीय सौंदर्याचा उपासक... रॉजर पेनरोज


अंक : जडण-घडण, जून २०२१ सदर : नोबेल पुरस्कार कथा गेल्या साठसत्तर वर्षात पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंकशास्त्र, .. आदी गणिताशी संबधित विषयात ज्यांना ज्यांना मोठे पुरस्कार मिळाले त्या सर्वांचा केव्हा ना केव्हातरी रॉजर पेनरोज यांच्याशी संबंध आलेला होता असं माझ्या वाचनात आलं होतं. रिचर्ड फिनमन, स्टिफन हॉकिंग्ज, व्हीलर.. किती नावे घ्यावीत.. तेव्हा हे नाव परिचयाचं झालेलं होतं. जेव्हा २०२० सालाचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आणि त्या यादीत पेनरोजचं नाव आलं तेव्हा अनेकांना वाटलं की यांना पुरस्कार मिळण्यात तसा उशीरच झालेला आहे.. आणि त्यांची करियर पाहिली तर आपल्यालाही तसंच वाटेल. असो.. फक्त शांतीचेच नाही तर सायन्सशी संबंधित माणसालाही नोबेल पुरस्कार देण्यात अनेकदा राजकारण, वैयक्तिक संबंध अन् इतर अनेक बाबी आडव्या येतात, हे काही आता गुपित राहिलेलं नाही.  रॉजर पेनरोज यांना पुरस्कार देताना, ‘कृष्णविवराचं विश्लेषण करताना जे गणित वापरले गेले ते आपण विकसित केलं अन् एकूण विश्वाच्या उत्पत्तीसाठी तसेच व्यापक सापेक्षतेच्या सिध्दान्तासाठी आपण विकसित केलेल्या अनेक गणितीय सूत्रांचा वापर करून अनेक कूट प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं.’ 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


जडण-घडण , जून २०२१ , व्यक्ती विशेष , विज्ञान

प्रतिक्रिया

  1.   3 वर्षांपूर्वी

    बेरीज आणि वजाबाकी या पलीकडे ( अगदी गुणाकार-भागाकार देखील नाही) गणित न समजणाऱ्या माझ्यासारख्याने अशा जीनियस लोकांविषयी वाचले की मुळात असलेला न्यूनगंड अधिकच बळावतो.. मात्र अशावेळी If you judge a fish by its ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid. हे वाक्य (खोटे का असेना) सांत्वन करते..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen