अंक : जडण घडण, जुलै २०२१ विज्ञानजगत मानवाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मानवी जीवनाचा विकास ऊर्जेच्या वापरावर अवलंबून असल्यामुळे हे घडणं स्वाभाविकच आहे. ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मानवाने आतापर्यंत अनेक स्रोतांचा उपयोग केला आहे. त्यात लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जैव वायू आणि जल ऊर्जेचा समावेश होता. गेल्या शतकात ऊर्जेचा आणखी एक स्रोत मानवाला सापडला आहे तो म्हणजे अणुऊर्जा. अणूच्या केंद्राचे विभाजन घडवून आणल्यास प्रचंड ऊर्जा बाहेर पडू शकते याची जाणीव झाल्याने त्याविषयीच्या संशोधनाने जोर धरला. E=mc2 हे आईनस्टाईनने शोधलेले समीकरण त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. दुर्दैवाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या ज्ञानाचा उपयोग अणुबाँब बनवण्यासाठी करण्यात आला. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या बाँम्ब हल्ल्यात झालेल्या विध्वंसानंतर या शक्तीचा वापर शांततामय कार्यासाठी करण्यासाठी विचार होऊ लागला. ऊर्जानिर्मिती ही त्याचीच परिणीती आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .