ललित, दिवाळी अंक २०२०
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
माझ्या घरातील किंवा कुटुंबातील वातावरण साहित्यिक नव्हते. माझ्या एका मामाने ‘अवधी’मध्ये काही दोहे आणि काही फुटकळ काव्य लिहिले होते. आणि माझ्या मोठ्या काकांच्या मुलाने उर्दूमध्ये काही गझला लिहिल्या होत्या. पण ते सगळे केवळ सांगण्यापुरतेच होते. त्यात कोणताही गंभीर प्रयत्न नव्हता आणि त्या दोघांपैकी कुणीही आमच्या बरोबर राहत नव्हते. माझ्या मोठ्या काकांची मुले सुरुवातीला आमच्या घरी राहून शिकली होती. पण मी चारपाच वर्षांचा होईपर्यंत त्यांची लग्ने देखील झाली होती आणि ते वेगळे राहू लागले होते. मला मोठा भाऊ नव्हता. माझे वडील फक्त उर्दू आणि इंग्रजी भाषा जाणत होते. त्यामुळे हिंदीचे एकही पुस्तक आमच्याकडे नव्हते. ‘रामायण’ देखील नाही. अर्थात लखनौच्या ‘नवलकिशोर प्रेस’ने छापलेले ‘रामायण’, ‘महाभारत’, (दोन्हीही नाट्य रूपात) तसेच भागवत... वडिलांकडे होते. पण ते ग्रंथ ते कापडात गुंडाळून ठेवत असत. या शिवाय ‘अलिफ लैला’, ‘गुल सनोवर’, ‘हातिमताई’ सारखी पुस्तके देखील होती. ती ते दुसर्या गाठोड्यात बांधून ठेवत असत. माझ्या आणि माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठ्या असलेल्या माझ्या बहिणीच्या अभ्यासाची सोडून इतर कोणती पुस्तके क्वचितच त्याकाळी माझ्या घरात असावीत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .